Pune Crime News | बाईक टॅक्सी सर्व्हिसेससाठी अतिरिक्त परवानगी न घेता विनापरवाना दुचाकी वाहनांद्वारे प्रवासी वाहतूक करणार्‍या रॅपिडो कंपनीवर परिवहन विभागाने दाखल केला गुन्हा

Pune Crime News | The Transport Department has registered a case against the company 'Rapido' for transporting passengers using two-wheelers without the necessary permits or additional authorization required for bike-taxi services.

पुणे : Pune Crime News |  मोटार वाहन अ‍ॅग्रीगेटर नियमावली २०२६ नुसार परिवहनेतर दुचाकी वाहनांसाठी बाईक टॅक्सी सर्व्हिसेस नियमावलीनुसार,  अतिरिक्त परवानगी घेणे बंधनकारक असतानाही रॅपिडो अ‍ॅपद्वारे दुचाकी वाहनांद्वारे अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या रॅपिडो कंपनीविरुद्ध परिवहन विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मोटार वाहन निरीक्षक प्रसाद गोवर्धन सुरवसे (वय ३४) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रोपेन ट्रान्सपोर्ट प्रा़ लि़ (रॅपिडो) कंपनी (रा. कृषाई बिल्डिंग, सांगवीनगर, परिहार चौकाजवळ, औंध) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. बनावट ग्राहक बनुन मोटार परिवहन निरीक्षकांनी अ‍ॅपवरुन दुचाकी बाईक बुक करुन ही कारवाई केली आहे.

रॅपिडो अ‍ॅपच्या माध्यमातून परिवहनेतर दुचाकी वाहनांद्वारे अवैध प्रवासी वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. या कंपनीच्या चालकांचे कोणत्याही प्रकारचा चारित्र पडताळणीचा दाखला किंवा इतर प्रकारची सुरक्षात्मक दृष्ट्या तपासणी केली जात नाही, ही बाब महिला प्रवाशांच्या दृष्टीने  असुरक्षित आहे. रॅपिडो अ‍ॅपने रोपेन ट्रान्सपोर्ट प्रा़ लि़ या नावाने आर टी ओ  पुणे यांना अर्ज केला होता. आर टी ओ ने हा अर्ज फेटाळला आहे. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांनी त्यांचे अपील फेटाळले आहे. परिवाहन आयुक्तांकडे रोपेन ट्रान्सपोर्ट यांनी अ‍ॅग्रीगेटर लायसेन्ससाठी अर्ज केला आहे. परंतु त्यांना अ‍ॅग्रीगेटर लायसन्स अजून प्राप्त झाले नाही. रॅपिडो कंपनीकडून कोणताही परवाना नसताना वाहतूक होत असल्याने परिवहन आयुक्तांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तसेच परवाना प्राप्त होईपर्यंत पुणे जिल्ह्यात सुरु केलेले अवैध बाईक टॅक्सी संचलन तात्काळ पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना दिल्या होता. तरीही अवैध वाहतूक केली जात होती.

रॅपिडो अ‍ॅपच्या माध्यमातून होणारी बेकायदेशीर अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी फिर्यादी, त्यांच्या सोबत सहायक मोटार वाहन निरीक्षक अक्षय निकम, प्राजक्ता गोडसे व चालक विशाल डोंबाळे हे विश्रांतवाडी गस्त घालत होते. फिर्यादी यांनी रॅपिडो अ‍ॅप्लीकेशन द्वारे बाईक बुक केली.  येरवडा कॉमर्सझोन ते कोथरुड बसडेपो अशी बाईक राईड बुक केली. राईडसाठी १३ किलोमीटर करीता १७९ रुपये भाडे दाखविले. काही वेळानंतर मोटारसायकल चालक शुभम आठवले (वय ३३, रा. प्रतिकनगर, येरवडा) हा दुचाकी घेऊन आला. चौकशीनंतर त्यांनी दुचाकी जप्त करुन विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात जमा केली़. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राऊत करीत आहेत.

You may have missed