Sanjay Raut On Ajit Pawar | “अजित पवारांनी पक्ष बदलला नाही तर आपल्या काकांचा मूळ पक्ष चोरला”; संजय राऊतांचा निशाणा

Sanjay Raut On Ajit Pawar

मुंबई: Sanjay Raut On Ajit Pawar | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून ‘महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेसाठी माझा महत्वपूर्ण संदेश’ या मथळ्याखाली एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी अर्थसंकल्पातील अनेक तरतुदींचा उल्लेख केला. अर्थसंकल्प जाहीर झाल्यापासून त्यांनी केलेल्या घोषणांबाबत विरोधक टीका करताना दिसत आहेत.

विशेषतः आगामी विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) डोळ्यांसमोर ठेवूनच हा अर्थसंकल्प मांडण्यात आल्याचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी अजित पवारांनी विशेष व्हिडीओ संदेश जारी केला असून त्यातून विरोधकांच्या आरोपांना त्यांनी उत्तर दिले आहे. याअगोदर अजित पवार अशाप्रकारे विशेष कॅमेरा सेटअप लावून व्हिडिओद्वारे माहिती देताना दिसून आले नाहीत. मात्र रोखठोक आणि परखड बोलण्याची शैली असलेल्या अजित पवार यांनी अशाप्रकारे प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अजित पवार यांनी “मी राजकारणात आल्यापासून एकही पक्ष बदललेला नाही, राजकारणात आल्यापासून जनता हाच माझा पक्ष राहिलेला आहे. मी पूर्वीही जनतेचाच होतो आणि आताही जनतेचाच आहे”, असे विधान त्या व्हिडिओत केले होते. यावरून अजित पवार यांना संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला आहे.

संजय राऊत म्हणाले, “अजित पवारांनी पक्ष बदलला नाही तर पक्ष चोरला.
आपल्या काकांचा मूळ पक्ष चोरला त्याबद्दल त्यांना खंत आणि खेद वाटला पाहिजे.
त्यांनी सरळ सरळ केलेलं पक्षांतर आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह नसते तर हा पक्ष त्यांच्या ताब्यात आला नसता.
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा महाराष्ट्रद्रोह उफाळला नसता तर बाळासाहेबांची शिवसेना धनुष्यबाणासह एकनाथ शिंदेंना मिळाली नसती.
तेव्हा जरा जपून बोला. लोकं ऐकत आहेत” असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar | “माझा दोष फक्त इतकाच आहे की…” अजित पवारांनी जारी केला व्हिडिओ संदेश; जाणून घ्या

Mahavikas Aghadi | ‘आघाडी सरकार आले, तर महिलांना एक लाख’; पृथ्वीराज चव्हाणांनी केलं जाहीर

Supriya Sule On Ajit Pawar Video | अजित पवारांच्या व्हिडिओवर सुप्रिया सुळेंकडून प्रत्युत्तर; म्हणाल्या, “अजित पवारांच्या आरोपांवर…”

You may have missed