Pune Porsche Car Accident Case | पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण : जिल्हा न्यायालयाच्या निकाला विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार – ॲड. मिलिंद पवार
पुणे : Pune Porsche Car Accident Case | पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडिल व बांधकाम व्यावसायिक विशाल आगरवाल (Vishal Agarwal) याला कोंढवा पोलीस ठाण्यातील (Kondhwa Police Station) गुन्ह्यात अटक करून लष्कर न्यायालयात (Lashkar Court Pune) हजर केले होते. विशाल आगरवाल याची पाच दिवसांची पोलीस कोठडी कोंढवा पोलिसांनी मागितली होती. विशाल अग्रवाल याच्या तर्फे ॲड. मिलिंद द. पवार (Adv. Milind Pawar) यांनी युक्तीवाद केला.
अॅड. पवार यांनी युक्तीवाद करताना, पूर्ण खोटा गुन्हा दाखल केला आहे. पाच वर्षांपूर्वी घटना घडली परंतु आत्ता पाच वर्षांनंतर फिर्याद दिली आहे. फक्त आगरवाल कुटुंबाला त्रास देण्यासाठी खोटा गुन्हा फिर्यादीने दाखल केला आहे. ॲड. मिलिंद द. पवार यांचा युक्तिवाद ऐकून लष्कर न्यायालयाने कोंढवा पोलिसांची पाच दिवसांची पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायालयीन कोठडीच्या (Judicial Custody) त्या निकाला विरोधात कोंढवा पोलिसांनी पुनर्रविलोचन याचीका (क्रिमीनल रिव्हीजन) पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयात केली होती. जिल्हा न्यायाधीश एस. आर. नरवडे (District Judge S. R. Narwade) यांनी कोंढवा पोलीसांची विनंती मान्य केली व ५ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
मुळात लष्कर न्यायालयाचे आदेश कायद्याला धरुनच होते. जुन्या घटनेची पाच वर्षांनी फिर्याद दिली आहे.
त्यामुळे पोलीस कोठडीची आवश्यकता नाही हा लष्कर न्यायालयाचा आदेश बरोबर होता.
त्या आदेशात सत्र न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नव्हती.
जिल्हा न्यायालयाने कायद्याला धरुन निकाल दिलेला नाही.
विशाल आगरवाल हा अगोदरच एका दुसऱ्या पोलीस ठाण्याच्या कोठडीत 5 जुलै पर्यंत आहे.
मग पुन्हा 5 जुलै पर्यंत कोंढवा पोलीस ठाण्याच्या कोठडीत कसा ठेवता येईल.
पूर्ण चुकीचा निकाल सत्र न्यायालयाने दिला आहे. आम्ही त्या निकाला विरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) दाद मागणार आहोत असे विशाल आगरवालचे वकील मिलींद द. पवार यांनी सांगितले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar | “माझा दोष फक्त इतकाच आहे की…” अजित पवारांनी जारी केला व्हिडिओ संदेश; जाणून घ्या
Mahavikas Aghadi | ‘आघाडी सरकार आले, तर महिलांना एक लाख’; पृथ्वीराज चव्हाणांनी केलं जाहीर