Pune Porsche Car Accident Case | पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण: अल्पवयीन आरोपीने लिहिला 300 शब्दांचा निबंध, RTO सोबत ट्रॅफिक नियोजन करणार

Porsche-Car-Accident-Pune-Court

पुणे : Pune Porsche Car Accident Case | पुणे कल्याणीनगर अपघात (Kalyani Nagar Car Accident) प्रकरण देशभरात गाजले होते. या अपघातात विशाल अग्रवाल (Builder Vishal Agarwal) यांच्या अल्पवयीन मुलाने भरधाव पोर्शे कार चालवत दोघांना चिरडले होत. त्यानंतर आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्याय मंडळापुढे (Juvenile Justice Board-JJB) हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्याला शिक्षा म्हणून 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगितले होते. तसेच वाहतूक नियमांचा अभ्यास करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) सोबत काम करण्याच्या अटी शर्तीवर जामीन दिला होता.

यानंतर माध्यमांमध्ये हे प्रकरण चांगलेच गाजले. बाल न्याय मंडळाने दिलेल्या निर्णयामुळे पुणे पोलिसांची मोठी नाचक्की झाली होती. एवढा भीषण अपघात होऊनही पोलिसांनी चुप्पी ठेवल्याने पोलिसांवर टीका झाली. त्यानंतर पोलिसांनी या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयाने निर्णय देताना बाल न्याय मंडळाची शिक्षा कायम ठेवत पुढील कारवाईचे निर्देश दिले होते.

आता या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. उच्च न्यायालयाने (Bombay High Court) बाल न्याय मंडळाची शिक्षा कायम ठेवायला सांगितली होती. त्याप्रमाणे बाल न्यायालयाने दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. आरोपी अल्पवयीन मुलाने 300 शब्दांचा निबंध लिहून बाल न्याय मंडळापुढे सादर केला आहे, अशी माहिती समोर येत आहे. तसेच समुपदेशन आणि वाहतूक नियमांचा अभ्यास करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) सोबत काम करणे यासारख्या इतर अटींचे पालन करण्यासाठी प्रक्रिया देखील सुरु झाली आहे, अशीही माहिती समोर येतेय.

पुण्यातील कल्याणी नगर परिसरात रविवारी (दि.19 मे) मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एका आलिशान पोर्शे कारने दुचाकीला धडक दिली.
या अपघातत आयटी अभियंता अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला.
मुलाला 15 तासांत जामीन देण्यात आला होता. त्यामुळे पोलीस प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.
त्यानंतर पोलिसांनी बाल न्याय मंडळाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध सत्र न्यायालयात अर्ज करुन अल्पवयीन आरोपीला सज्ञान समजावे, यासाठी अर्ज केला होता.
सत्र न्यायालयाने पुणे पोलिसांना परत बाल न्याय मंडळात अर्ज करण्यास सांगितले.
त्यानुसार पुणे पोलिसांनी मंडळात अर्ज केला असता अल्पवयीन मुलाला 14 दिवसांसाठी बालसुधारगृहात ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : टिंडर डेटिंग अ‍ॅपच्या ओळखीतून महिलेवर बलात्कार, आरोपी गजाआड

Fix Deposit Interest Rates | HDFC आणि Axis बँकेने ग्राहकांना दिली भेट, या लोकांना होईल फायदा

Anant-Radhika Wedding | सोनिया गांधी, राहुल… कोणा-कोणाला मुकेश अंबानी यांनी दिले निमंत्रण, ही आहे गेस्ट लिस्ट

You may have missed