Pune Crime News | पुणे : बॉडी बिल्डिंग करणाऱ्यांनो सावधान! ‘बॉडी बिल्डिंग’साठी ‘स्टिरॉइड’सची विक्री, इंजेक्शनच्या 13 बाटल्या जप्त

Body building

जिम व्यावसायिकाला अटक

पुणे : Pune Crime News | ‘बॉडी बिल्डिंग’ करणाऱ्या तरुणांना घातक स्टीरॉईड्सची विक्री करुन त्यांच्या जिवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बॉडी बिल्डिंगसाठी वापरली जाणारी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर घेण्याची गरज असताना त्या औषधांची बेकायदा विक्री करणाऱ्या जिम व्यावसायिकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) अटक केली आहे. त्याच्याकडून मेफेंटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या 13 बाटल्या तसेच पाच इंजेक्शन सीरिंज जप्त केल्या आहेत.

आझाद मुमताज खान Azad Mumtaz Khan (वय-41 रा. आंबेगाव बु.) असे अटक केलेल्या जिम व्यावसायिकाचे नाव आहे. खान याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आयपीसी 336, 276 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जून 2024 रोजी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकाला माहिती मिळाली की, सातारा रस्त्यावरील धनकवडी येथे असलेल्या लोखंडी पुलाच्या अलीकडे अझाद खान आला असून तो बॉडी बिल्डिंगसाठी बेकायदेशीर इंजेक्शनची विक्री करत आहे. पोलिसांनी त्याठिकाणी सापळा रचून आझाद खान याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता तो जिम व्यावसायिक असल्याची माहिती मिळाली. तसेच त्याचा चौकशीत मेफेन्टरमाईन सल्फेट या औषधाची विक्री करत असल्याचे समजले. पोलिसांनी इंजेक्शनच्या 13 बाटल्या व पाच इंजेक्शन सीरिंज जप्त केल्या. एका इंजेक्शन ची किंमत 400 रुपये असून त्याने आत्तापर्यंत असे किती इंजेक्शनची विक्री केली आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत. आरोपी ‘मास्टरपीस जिम’ मध्ये कोच आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil),
सहायक पोलीस आयुक्त नंदीनी वग्याणी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील,
पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने केली.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : टिंडर डेटिंग अ‍ॅपच्या ओळखीतून महिलेवर बलात्कार, आरोपी गजाआड

Fix Deposit Interest Rates | HDFC आणि Axis बँकेने ग्राहकांना दिली भेट, या लोकांना होईल फायदा

Anant-Radhika Wedding | सोनिया गांधी, राहुल… कोणा-कोणाला मुकेश अंबानी यांनी दिले निमंत्रण, ही आहे गेस्ट लिस्ट