MLA Siddharth Shirole | वाहन फिटनेस सर्टिफिकेटवरील दंड रद्द करून रिक्षा चालकांना दिलासा द्या

rikshwa

पुणे – MLA Siddharth Shirole | वाहन फिटनेस सर्टिफिकेट चे नूतनीकरण न केल्यास आकारला जाणारा दंड रिक्षा चालकांना परवडणारा नसल्याने रद्द करा आणि त्यांना दिलासा द्या, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (शुक्रवारी) विधानसभेत केली.

रिक्षाचालकांना दरवर्षी वाहन फिटनेस सर्टिफिकेट चे नूतनीकरण करून घेणे अनिवार्य असते. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तसे सर्टिफिकेट असणे हे गरचेचे आहे, पण, नूतनीकरण वेळेत झाले नाही तर रिक्षाचालकांकडून प्रतिदिन ५० रुपये दंड आकारला जातो. ही दंडाची रक्कम वाढत जाते. कालांतराने दंडाची रक्कम भरणे अशक्य होते, एवढी ती वाढते. त्यामुळे सर्टिफिकेट चे नूतनीकरण काही कारणाने लांबत जाते, हे लक्षात घेऊन दंडच रद्द करावा, अशी मागणी आमदार शिरोळे यांनी केली. (MLA Siddharth Shirole)

घराचा खर्च, रिक्षासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड, मुलांचे शिक्षण,
आरोग्य अशा अनेक बाबींवर खर्च करत रिक्षा चालक कष्टाने संसार चालवत असतो,
अशा स्थितीत फिटनेस सर्टिफिकेट नूतनीकरणाचा दंड हा मोठा भार होतो.
त्या दंडातून मुक्तता करून रिक्षा चालकांना दिलासा द्यावा, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : टिंडर डेटिंग अ‍ॅपच्या ओळखीतून महिलेवर बलात्कार, आरोपी गजाआड

Fix Deposit Interest Rates | HDFC आणि Axis बँकेने ग्राहकांना दिली भेट, या लोकांना होईल फायदा

Anant-Radhika Wedding | सोनिया गांधी, राहुल… कोणा-कोणाला मुकेश अंबानी यांनी दिले निमंत्रण, ही आहे गेस्ट लिस्ट

You may have missed