Mahavikas Aghadi | काँग्रेसनं वाढवलं मित्रपक्षांचं टेन्शन, ही रणनीती, दबावतंत्र की वेगळाच विचार, राजकीय वर्तुळात चर्चा

Mahavikas-Aghadi

मुंबई : Mahavikas Aghadi | विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) जवळ येऊ लागल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. राज्यात विरोधकांची महाविकास आघाडी आणि सत्ताधारी पक्षांची महायुती (Mahayuti) असली तरी विधानसभेच्या २८८ जागांचे वाटप करताना दोन्ही युती-आघाडीत तू तू मै मै होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आतापासून काही पक्षांनी दबावाचे राजकारण सुरू केले आहे. अशाच प्रकारची एक खेळी काँग्रेसने (Congress) खेळल्याने ठाकरे-पवारांचं टेन्शन वाढणार असल्याचे दिसते. (Shivsena UBT)

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. त्यामुळे काँग्रेसची ही रणनीती आहे की जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी महाविकास आघाडीवर दबाव आणण्याचे राजकारण आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Sharad Pawar NCP)

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे १३ जागा जिंकल्या तर पक्षात बंडखोरी करून अपक्ष उभा राहिलेला एक खासदार पुन्हा काँग्रेसमध्ये सहभागी झाल्याने काँग्रेसचे आता १४ खासदार झाले आहेत.

लोकसभेत हे यश मिळाल्याने काँग्रेसची मविआमधील ताकद वाढली आहे. मात्र, काँग्रेसने २८८ मतदारसंघातील इच्छुकांचे अर्ज मागवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. काँग्रेसने विधानसभेसाठी इच्छुकांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ मध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या निर्देशावरून या निवडणुकीसाठी पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उमेदवारी अर्जाचा नमुना सोबत जोडला आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

पत्रात पुढे म्हटले आहे की, इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयात
१० ऑगस्ट २०२४ पर्यंत जमा करावेत. विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्जासोबत
सर्वसाधारण वर्गासाठी २० हजार आणि अनु जाती, जमाती,
महिला उमेदवारांसाठी १० हजार रुपये पक्षनिधी म्हणून रोख अथवा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या
नावे डीडीद्वारे किंवा जिल्हा कमिटीकडे जमा करावेत.

या पत्रात म्हटले आहे की, जे उमेदवारी अर्ज जिल्हा काँग्रेस कमिटीकडे जमा होतील
ते उमेदवारी अर्ज पक्षनिधीसह प्रदेश कार्यालयात उपरोक्त दिनांकापूर्वी सादर करावेत.
आपापल्या जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांपर्यंत ही माहिती पोहचवावी.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Leopard Dive Ghat Pune | पुणे : दिवे घाटात भररस्त्यात प्रवाशांना बिबट्याचं दर्शन, व्हिडीओ व्हायरल (Video)

Ravet Pune Crime News | पिंपरी: जागेच्या व्यवहारात महिलेची फसवणूक, डेव्हलपर्सवर गुन्हा दाखल