Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी: नफा न देता भागीदार बिल्डरची फसवणूक, मनोरे बिल्डर्सच्या चौघांवर FIR
पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | नोंदणीकृत भागीदारी संस्था असल्याचे खोटे सांगून 34 लाख रुपये घेऊन भागीदार करुन घेतले. मात्र, त्यानंतर विकसन विक्रीतील भागीदारीतील हक्क डावलून मिळकत स्वत:च्या नावावर करुन तसेच 20 टक्के नफ्याची रक्कम न देता फसवणूक केली (Cheating Fraud Case). याप्रकरणी वाकड पोलिसांनी (Wakad Police Station) मनोरे बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या (Manore Builder & Developers ) चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 8 जुलै 2021 ते 22 जून 2023 या कालावधीत नखातेवस्ती, रहाटणी येथील कार्यालयात घडला आहे.
याबाबत गजानन विठ्ठलराव कर्णे (वय-40 रा. दत्तनगर, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन मनोरे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे माधव मल्लिकार्जुन मनोरे Madhav Mallikarjun Manore (वय-53), विश्वनाथ माधव मनोरे Vishwanath Madhav Manore (वय-25), सोमनाथ माधव मनोरे Somnath Madhav Manore (वय-23 सर्व रा. मथुरा कॉलनी, नखातेवस्ती, रहाटणी), नागनाथ इरवंत हुडगे Nagnath Irwant Hudge (वय-45 रा. संभाजीनगर, चाकुर, ता. चाकुर जि. लातूर) यांच्यावर आयपीसी 406, 420, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गजानन कर्णे यांचा लँड डेव्हलपमेंट अँड कन्स्ट्रक्शन चा व्यवसाय आहे. आरोपींनी संगनमत करुन मनोरे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ही नोंदणीकृत भागीदारी संस्था असल्याचे फिर्यादी यांना सांगितले. कर्णे यांना या संस्थेत भागीदार करुन घेतले. भागीदार करुन घेतल्यानंतर कर्णे यांनी संस्थेमध्ये 34 लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यानुसार आरोपींनी कर्णे यांच्या सोबत समजुतीचा करारनामा केला.
करारनाम्यानुसार विकसन विक्रीतून मिळणाऱ्या एकूण नफ्यापैकी 20 टक्के नफा कर्णे यांना देण्याचे ठरले होते.
मात्र, आरोपींनी मिळकतीचे विकसन विक्रीतील भागीदारीतील कर्णे यांचे हक्क डावलून
त्यामधील मिळकत स्वत:च्या नावावर करुन घेतली.
तसेच कंपनीला झालेल्या एकूण नफ्यामधून आणि उर्वरित मिळकतीमधील फिर्यादी
यांच्या हिस्स्याची 20 टक्के रक्कम परत न करता अपहार केला.
आरोपींनी संगनमत करुन विश्वासघाताने फसवणूक केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ravet Pune Crime News | पिंपरी: जागेच्या व्यवहारात महिलेची फसवणूक, डेव्हलपर्सवर गुन्हा दाखल