Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : घराला रंग देण्यासाठी आला अन् दागिने घेऊन गेला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Arrest

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | घराला कलर देण्यासाठी आलेल्या पेंटरने घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण दीड लाखांचा ऐवज चोरून नेला. देहूरोड पोलिसांनी (Dehu Raod Police Station)आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार सोमवारी (दि.1 जुलै) सायंकाळी साडे सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान किवळे येथील के टाऊन सोसायटीत (K Town Kiwale) घडला होता. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

मुलायम कुमार राजेंद्र निसाद (वय-24 रा. गांधी नगर, दत्तमंदिराजवळ, देहुरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत कुलदिप प्रेमचंद शर्मा (वय-42 रा. के. टाऊन सोसायटी फ्लॅट नं. 1007, किवळे) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांच्या फ्लॅटचे कलरचे काम आरोपी मुलायम निसाद याला दिले होते. आरोपी फिर्यादी यांच्या घराला कलर देत होता. त्याने फिर्य़ादी यांच्या घरच्यांना धुळ उडेल म्हणून हॉलमध्ये थांबण्यास सांगितले. आरोपी बेडरुममध्ये कलर देत असताना त्याने कपाटातील फिर्यादी यांच्या पत्नीच्या पर्स मधून दीड लाख रुपये किमतीचे 25 ग्रॅम वजनाचे दागिने आणि सहा हजार रुपये चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्य़ादी यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तपास पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

प्रवासात दागिने लंपास

बसने प्रवास करत असताना एका ज्येष्ठ महिलेच्या पर्समधून सहा लाख रुपये किमतीचे
दहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व सात हजार रुपये रोख रक्कम चोरली.
हा प्रकार 28 जून रोजी सकाळी सव्वा दहा ते साडे बाराच्या दरम्यान पीएमटी बस स्टॉप वाघोली
ते मनपा व मनपा ते मुखई चौक दरम्यान घडला. याप्रकरणी उर्मिला अरुण लाटे
(वय-66 रा. छत्रपती संभाजीनगर) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Leopard Dive Ghat Pune | पुणे : दिवे घाटात भररस्त्यात प्रवाशांना बिबट्याचं दर्शन, व्हिडीओ व्हायरल (Video)

Ravet Pune Crime News | पिंपरी: जागेच्या व्यवहारात महिलेची फसवणूक, डेव्हलपर्सवर गुन्हा दाखल

You may have missed