Sharad Pawar On Devendra Fadnavis | “फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला पण आता…” शरद पवारांचे मोठे विधान

Sharad Pawar On Devendra Fadnavis

पुणे : Sharad Pawar On Devendra Fadnavis | २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Govt) स्थापन करताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपाशी (BJP) फारकत घेत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. महाविकास आघाडीला अडीच वर्षे सत्ता उपभोगता आली. त्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यात पुन्हा भाजपा महायुतीचे सरकार (Mahayuti Govt) आले. या सरकारमध्ये शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. याच घटनांमध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी भाष्य केले.

शरद पवार यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला की, देवेंद्र फडणवीस २०१९ आधी म्हणाले होते शरद पवारांचा राजकीय काळ संपला. सध्याचे राजकारण पाहता यावर काय म्हणता येईल? शरद पवारांच्या टप्प्यात आलेल्या या प्रश्नावर त्यांनी चांगलाच सिक्सर मारला.

पवार म्हणाले, “देवेंद्र फडणवीस जेव्हा असे म्हणाले होते तेव्हा आम्ही सरकार बदलून दाखवलं. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात कुणी सरकार बनवले… आम्ही लोकांनीच बनविले. कुणाचा काळ संपला हे त्यांना आता कळलंच असेल. इतकंच नाही, एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये त्यांना सत्ता तर मिळाली पण त्यांना मुख्यमंत्र्याचे नुसते मंत्री व्हावे लागले. त्यामुळे काळ कुणाचा संपला हे मी सांगायला नको.

लोक बोलून जातात, आपण दुर्लक्ष करायचे असते.
देवेंद्र यांचे वडिल गंगाधर फडणवीस हे विधानपरिषदेत होते.
चांगला माणूस होता. देवेंद्र फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला होता.
त्यांच्यात प्रतिभा जाणवत होती. पण आता मात्र मला त्यांची धावपळ पूर्णपणे वेगळी वाटते”
अशा शब्दांत शरद पवारांनी दिलेल्या मुलाखतीत महत्त्वाचे विधान केले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kohinoor Sapphire at Tathawade | पिंपरी : ‘कोहिनूर सफायर’च्या बांधकाम साईटवर 19 व्या मजल्यावरुन पडून अल्पवयीन मजुराचा मृत्यू

Raigad ACB Trap | बांधकामाचे देयक मंजूर करण्यासाठी वित्त अधिकाऱ्याला लाच घेताना एसीबीकडून अटक

Ajit Pawar Vs Sharad Pawar | पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला लवकरच धक्का,
माजी महापौरांसह 15 ते 20 नगरसेवक ‘या’ मुहूर्तावर वाजवणार तुतारी!

Pimpri Chinchwad Cyber Cell | पिंपरी : कर्ज फेडण्यासाठी दिघीतील व्यक्तीला अडीच कोटींचा गंडा,
सायबर पोलिसांनी गुजरातमधून आवळल्या मुसक्या (Video)

Someshwar Foundation Pune | ‘ड्रग्जचे व्यसन घरात येण्याची वाट पाहू नका’ ! अभिनेता रमेश परदेशी यांचे आवाहन