Pune Hit & Run Case | पुणे हिट अँड रन: ऑनड्युटी असलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना उडवलं, एकाचा मृत्यू तर एक गंभीर

Pune Hit & Run Case

पुणे : Pune Hit & Run Case | पुण्यात गस्त घालणाऱ्या (मार्शल ड्युटी) दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या दुचाकीला भरधाव वेगात जाणाऱ्या कारने धडक दिली. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये (Ruby Hall Pune) उपचार सुरु आहेत. हा अपघात जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (Pune Mumbai Highway Accident) बोपोडी परिसरात असलेल्या हॅरीस पुलाखालील (Harris Bridge Bopodi) अंडरपास जवळ मध्य रात्री दोनच्या सुमारास झाला. अपघातानंतर कार चालक पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (Policeman Dead In Accident)

खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) कार्यरत असणारे समाधान कोळी आणि संजोग शिंदे हे दोघे मध्यरात्री बीट मार्शल म्हणून कर्तव्य बजावत होते. दुचाकीवरून गस्त घालण्यासाठी निघाले असता त्यांना समोरून आलेल्या भरधाव चारचाकी वाहनाने भीषण धडक दिली. यात समाधान कोळी यांचा जागीच मृत्यू झाला, तर संजोग शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. (Pune Hit & Run Case)

दरम्यान, पोलीस आयुक्त अमितश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी रुबी हॉल रुग्णालयात धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फरासखाना वाहतूक विभागातील महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याला जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच दुसरीकडे अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने पोलीस भीतीच्या छायेत असल्याचे पहायला मिळत आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kohinoor Sapphire at Tathawade | पिंपरी : ‘कोहिनूर सफायर’च्या बांधकाम साईटवर 19 व्या मजल्यावरुन पडून अल्पवयीन मजुराचा मृत्यू

Raigad ACB Trap | बांधकामाचे देयक मंजूर करण्यासाठी वित्त अधिकाऱ्याला लाच घेताना एसीबीकडून अटक

Ajit Pawar Vs Sharad Pawar | पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला लवकरच धक्का,
माजी महापौरांसह 15 ते 20 नगरसेवक ‘या’ मुहूर्तावर वाजवणार तुतारी!

Pimpri Chinchwad Cyber Cell | पिंपरी : कर्ज फेडण्यासाठी दिघीतील व्यक्तीला अडीच कोटींचा गंडा,
सायबर पोलिसांनी गुजरातमधून आवळल्या मुसक्या (Video)

Someshwar Foundation Pune | ‘ड्रग्जचे व्यसन घरात येण्याची वाट पाहू नका’ ! अभिनेता रमेश परदेशी यांचे आवाहन