Raigad Fort | रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
रायगड: Raigad Fort | मागील दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश पाऊस सुरू असून धडकी भरवणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. धो-धो पडणारा पाऊस आणि ढगफुटी सदृश परिस्थिती यांमुळे किल्ले रायगडाच्या पायऱ्यांना धबधब्याचं स्वरुप प्राप्त झालं आहे. व्हायरल व्हिडीओंमध्ये किल्ल्याच्या पायऱ्यांवरून अक्राळविक्राळपणे पाणी वाहताना दिसत आहे. त्यात काही पर्यटकसुद्धा अडकल्याचं दिसून येत आहे. बुरूज आणि कड्यांवरूनही धबधब्यासारखं पाणी वाहत आहे.
दरम्यान आता सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने रायगड किल्ला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याठिकाणी सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. तसेच सद्यस्थितीत किल्ले रायगडावर असलेल्या पर्यटकांना रोपवेदेखील पुढील आदेशपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
रायगड किल्ला पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आलेला आहे. रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे रायगड किल्ला पर्यटक यांच्याकरिता बंद करण्यात आल्याचे जिल्ह्याधिकारी यांनी सांगितले आहे. रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग करून बंद करण्यात आला असून पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Hit & Run Case | पुणे हिट अँड रन: ऑनड्युटी असलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना उडवलं,
एकाचा मृत्यू तर एक गंभीर
Rain In Lonavala Khandala | लोणावळा, खंडाळ्यात संततधार; पाऊस, धुके अन् पर्यटकांची गर्दी
Sharad Pawar On Devendra Fadnavis | “फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला पण आता…”
शरद पवारांचे मोठे विधान