Pune Murder Case | पुणे: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा निघृण खून करुन उच्चशिक्षीत पतीनं रचला बनाव, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Pune Murder Case

पुणे : Pune Murder Case | सात महिन्यापूर्वी लग्न झालेल्या उच्चशिक्षित पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा निघृण खून केला. खून केल्यानंतर आरोपीने बनाव रचला. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) स्थानिक गुन्हे शाखेच्या (Pune LCB) पथकाने तपास करुन आरोपी पतीला अटक केली आहे. पत्नीच्या खुनाची फिर्याद देणारा पतीच खुनी निघाल्याने खळबळ उडाली आहे.

शीतल स्वप्नील रणपिसे हेचा मृतदेह बुधवारी (दि.3) दुपारी राहत्या घरात आढळून आला होता. दोरीने गळा आवळून व इलेक्ट्रीक वायरने शॉक देऊन तीचा खून झाल्याने खळबळ उडाली होती. याबबत शीतलचा पती स्वप्नील श्यामराव रणपिसे (वय-26 रा. रांजणगाव सांडस, ता. शिरुर) याने याने आम्ही कुणी घरात नसताना अज्ञात व्यक्तीने शीतलचा खून केला, अशी फिर्याद शिरुर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

सात महिन्यापूर्वी विवाह झालेल्या या नवविवाहितेचा निघृण पद्धतीने झालेल्या खुनाच्या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. विवाहितेचे घर, परिसराची तपास पथकाने पाहणी करुन आसपास चौकशी केली. तसेच घरामध्ये सामान अस्ताव्यस्त पडलेले असल्याने हा प्रकार चोरीच्या उद्देशाने घडला आहे का, याचा देखील पोलिसांनी तपास केला. दरम्यान, पोलिसांनी स्वप्नील याच्याकडे चौकशी केली. उच्चशिक्षित असल्याने तो वारंवार वेगवेगळी हकिकत सांगत होता.

पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान पत्नी शितल हिचा चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याची कबुली आरोपी स्वप्नील याने दिली. स्वप्नील हा शीतल यांच्यात सतत वाद होत होते. तो तिच्या चारीत्र्यावर नेहमी संशय घेत होता व तिच्या गत आयुष्याबाबत तिला वारंवार विचारण करत होता. यातून त्यांच्यात सतत वाद होते. त्यातूनच त्याने तीचा खून केला. आरोपी स्वप्नील रणपिसे याने बीएस्सी केमेस्ट्री, एमबीए चे शिक्षण घेतले आहे. तो संशयी स्वभावाचा असल्याने त्याने पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेऊन खून केला. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 10 जुलै पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे. पुढील तपास शिरुर पोलीस करीत आहेत. (Pune Murder Case)

ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, एसडी.पी.ओ. प्रशांत ढोले
यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,
शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, एलसीबीचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल गावडे,
अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलीस अंमलदार सचिन घाडगे, अजित भुजबळ,
तुषार पंदारे योगेश नागरगोजे, राजू मोमीन, अतुल डेरे, जनार्दन शेळके, मंगेश थिगळे, संजू जाधव, सागर धुमाळ,
काशिनाथ राजापूरे, अक्षय सुपे, गोपीनाथ चव्हाण, नितीन सुद्रीक, परशुराम सांगळे, प्रफुल्ल भगत, राहुल भवर,
नाथा जगताप, नितेश थोरात, सचिन भोई, विनोद काळे, शिवाजी भोते यांच्या पथकाने केली.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Hit & Run Case | पुणे हिट अँड रन: ऑनड्युटी असलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना उडवलं,
एकाचा मृत्यू तर एक गंभीर

Rain In Lonavala Khandala | लोणावळा, खंडाळ्यात संततधार; पाऊस, धुके अन् पर्यटकांची गर्दी

Sharad Pawar On Devendra Fadnavis | “फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला पण आता…”
शरद पवारांचे मोठे विधान

You may have missed