Pune Crime News | पुणे: महिलेचा पाठलाग करुन अश्लील शेरेबाजी, 3 रोडरोमीयोंवर गुन्हा
पुणे : Bibvewadi Pune Crime News | रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या छेडछाडीच्या घटना घडत आहेत. पोलिसांकडून रोडरोमीयोंवर कारवाई करण्यात येत. मात्र, अशा घटना वारंवार घडत आहेत. बिबवेवाडी परिसरात राहणारी महिला कामावरुन जात असताना तीन जणांनी तिचा पाठलाग करुन अश्लील शेरेबाजी केली. तसेच स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनभंग केला (Molestation Case). हा प्रकार जगताप डेअरी (Jagtap Dairy Pune) जवळ घडला आहे.
याबाबत 31 वर्षीय महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर किसन धुमाळ, योगेश ढेबे, हरि राठोड (तिघे रा. अंबिकानगर, अप्पर बिबवेवाडी, पुणे) यांच्यावर आयपीसी 354, 509, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कामावरुन घरी जात असताना सागर धुमाळ याने जवळ येऊन हात पकडला. तसेच तु मला खुप आवडे असे म्हणून अश्लील वर्तन केले. तर इतर आरोपींनी अश्लील शेरेबाजी करुन अश्लील हातवारे केले. तर हरी राठोड याने बघून घेण्याची धमकी देऊन असभ्य वर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
शाळकरी मुलीचा विनयभंग
पुणे : पायी शाळेत जाणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिच्यासोबत अश्लील चाळे करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनयभंग केला. हा प्रकार शनिवारी (दि.6) सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास कुरण बुद्रुक येथे घडला आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी (Uttam Nagar Police) एका तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
याबाबत 15 वर्षाच्या मुलीने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.
त्यानुसार नारायण प्रताप तावरे (रा. कुरण बुद्रुक, ता. वेल्हे)
याच्यावर भान्यासं 74, 75 सह पोक्सो अॅक्ट नसार गुन्हा दाखल केला आहे.
पिडित मुलगी शाळेत जात असताना आरोपी पाठीमागून दुचाकीवर आला.
त्याने मुलीला अडवून तु माझ्या सोबत का बोलत नाही असे म्हणून तिला मिठी मारली.
तसेच तिला अश्लील स्पर्श करुन विनयभंग केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Hit & Run Case | पुणे हिट अँड रन: ऑनड्युटी असलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना उडवलं,
एकाचा मृत्यू तर एक गंभीर
Rain In Lonavala Khandala | लोणावळा, खंडाळ्यात संततधार; पाऊस, धुके अन् पर्यटकांची गर्दी
Sharad Pawar On Devendra Fadnavis | “फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला पण आता…”
शरद पवारांचे मोठे विधान