Leopard In Katraj Ghat Pune | कात्रज परिसरात बिबट्याचा मुक्त वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Leopard In Katraj Ghat Pune

पुणे : Leopard In Katraj Ghat Pune | मागील दोन दिवसांपूर्वी सासवड रोडवरील दिवे घाटात बिबट्या रस्त्यावरून जात असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ही घटना ताजी असताना भिलारेवाडी येथील गॅरेज व्यावसायिक सय्यद सैफ व सहकारी साजिद शेख चारचाकीतून जात असताना रविवारी रात्री (दि.७) आर्यन स्कुल जवळ असलेल्या क्रेशर परिसरात बिबट्या बसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये बिबट्याचा व्हिडिओ आणि फोटोही काढला.

आम्ही दोघे चारचाकीमधून जात होतो. बिबट्या अगदी बिनधास्त बसला होता. आम्ही आल्याची चाहूल लागताच बिबट्या निघून गेल्याचे सैफ यांनी सांगितले. बिबट्याचे मानवी वस्तीकडे वास्तव्य वाढू लागले आहे. त्यामुळे दिवसा घराबाहेर पडणे ही अवघड झाले आहे. (Leopard In Katraj Ghat Pune)

मागील काही काळापासून पुणे जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला असून कात्रज घाट परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरु असल्याचे समोर आले आहे. दरम्यान कात्रज घाटातील बिबट्याच्या दर्शनामुळे गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी आदी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कात्रज घाट आणि परिसर वनक्षेत्र आहे. याअगोदरही या भागात बिबट्या सदृश प्राणी दिसून आले आहेत.
काही दिवसांपूर्वी भिलारेवाडी आणि गुजर-निंबाळकरवाडी परिसरात स्थानिक नागरिकांच्या नजरेस बिबट्या आढळला होता.
याबाबत वन अधिकारी संभाजी गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Hit & Run Case | पुणे हिट अँड रन: ऑनड्युटी असलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना उडवलं,
एकाचा मृत्यू तर एक गंभीर

Rain In Lonavala Khandala | लोणावळा, खंडाळ्यात संततधार; पाऊस, धुके अन् पर्यटकांची गर्दी

Sharad Pawar On Devendra Fadnavis | “फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला पण आता…”
शरद पवारांचे मोठे विधान

You may have missed