Attack On Polieman In Pimpri | पिंपरी: चोरीचा माल तपासण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला, एकजण जखमी; 5 जणांना अटक
पिंपरी : Attack On Polieman In Pimpri | दोन दिवसांपूर्वी पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई करत असताना एका मद्यपीने महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत (Shirgaon Police Station) पाच जणांच्या टोळक्याने चोरीला गेलेला माल तपासण्यासाठी आलेल्या गुन्हे शाखा युनीट -5 च्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. पोलिसांना लाकडी बांबू आणि लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि.7) दुपारी दोनच्या सुमारास साळुंब्रे गावच्या हद्दीतील कासारसाई रोड लगत असलेल्या भंगार दुकानात घडली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
पोलीस नाईक अली अब्दुल शेख (वय-32) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नईम शहा (वय-23), नसीम शहा (वय-35), कलीम शहा (वय-25) नसीम मुदही (वय-24), कलीम मुदही (वय-18 सर्व रा. गोडुंब्रे, ता. मावळ मुळ रा. दुबायल तिवारी, ता. इटवा, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 189(2), 191(2)(3), 190, 121(1)(2), 132 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अली शेख हे गुन्हे शाखेच्या युनिट पाच मध्ये कार्यरत आहेत. अली शेख आणि त्याचे सहकारी पोलीस शिपाई अनिल निरवणे हे रविवारी दुपारी दोनच्या साळुंब्रे गावच्या हद्दीतील कासारसाई रोड लगत असलेल्या भंगार दुकानात चोरीस गेलेल्या मालाची तपासणी करण्यासाठी गेले होते. तपासणी करत असताना भंगार दुकानात असलेल्या आरोपींनी फिर्यादी व निरवणे यांना शिवीगाळ करुन लोखंडी रॉड घेऊन अंगावर धावून आले.
आरोपी नईम शहा याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने फिर्यादी अली शेख यांच्या डोक्यात मारला.
मात्र, शेख यांनी हात मध्ये घातल्याने अंगठ्याजवळ गंभीर मार बसल्याने ते जखमी झाले.
तर इतर आरोपींनी लोखंडी रॉडने हातावर, पायावर, पाठीवर मारुन खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच पोलीस शिपाई अनिल निरवणे यांना देखील धक्काबुक्की केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Hit & Run Case | पुणे हिट अँड रन: ऑनड्युटी असलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना उडवलं,
एकाचा मृत्यू तर एक गंभीर
Rain In Lonavala Khandala | लोणावळा, खंडाळ्यात संततधार; पाऊस, धुके अन् पर्यटकांची गर्दी
Sharad Pawar On Devendra Fadnavis | “फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला पण आता…”
शरद पवारांचे मोठे विधान