Sharad Pawar NCP – Rahul Narwekar | शरद पवार गटाच्या निर्णयामुळे राहुल नार्वेकरांचं वाढलं टेन्शन; सुप्रीम कोर्टात धाव; जाणून घ्या
मुंबई : Sharad Pawar NCP – Rahul Narwekar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र करा अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे.
याप्रकरणी २३ जुलैला मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शरद पवार गटातील तसेच अजित पवार गटातील कोणत्याही आमदाराला अपात्र ठरवले नव्हते. मात्र पक्षाच्या बाबतीत अजित पवारांकडे असलेला गट हा मूळ राष्ट्रवादी असल्याचा निर्णय दिला होता.
विधिमंडळात असलेल्या सदस्यसंख्येच्या निर्णयाच्या आधारे नार्वेकर यांनी हा निकाल दिल्याचे सांगितले होते. नार्वेकर यांचा निकाल येण्याआधी निवडणूक आयोगानेही चिन्ह हे अजित पवार गटाला दिले होते. त्यामुळे नार्वेकर यांच्या निर्णयाबाबत उत्सुकता होती. मात्र नार्वेकर यांनी अजित पवारांच्या बाजूने निकाल दिल्याने या निकालाविरोधात शरद पवार गटाने न्यायालयात धाव घेतली. (Sharad Pawar NCP – Rahul Narwekar)
न्यायालयाने याआधीच अजित पवार गटाला सूचना केल्या आहेत
की घड्याळ चिन्हाचा वापर करताना हे चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याचे वर्तमानपत्रातून जाहीर करावे.
तसेच चिन्ह वापरताना त्याखाली तशी सूचना लिहावी. मात्र अजित पवार गटाकडून
या सूचना पाळल्या जात नसल्याचे शरद पवार गटाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Hit & Run Case | पुणे हिट अँड रन: ऑनड्युटी असलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना उडवलं,
एकाचा मृत्यू तर एक गंभीर
Rain In Lonavala Khandala | लोणावळा, खंडाळ्यात संततधार; पाऊस, धुके अन् पर्यटकांची गर्दी
Sharad Pawar On Devendra Fadnavis | “फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला पण आता…”
शरद पवारांचे मोठे विधान