Pune Crime News | पिंपरी: दहशत पसरवणाऱ्या स्वयंघोषित भाईला अटक

Arrest

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | दुकानातील सामान उधार देत नसल्याच्या कारणावरून लोखंडी कोयत्याने अंड्याची बरणी फोडून महिलेच्या हातावर कोयता मारुन (Koyta Attack) जखमी केले. तसेच हातातील कोयता हवेत फिरवून मी इथला भाई असे असे म्हणून दहशत पसरवली. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी (Chinchwad Police Station) स्वयंघोषित भाईला अटक केली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.6) सकाळी साडे दहाच्या सुमारास बिजलीनगर चिंचवड (Bijali Nagar Chinchwad) येथे महिलेच्या राहत्या घरासमोर घडला आहे.

याबाबत उमा राजकुमार कांबळे (वय-40 रा. गणेश कॉलनी, बिजलीनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सुनिल मारुती लोणी (वय-22 रा. शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड) याच्यावर आयपीसी 118(1), 352, 351(3), 324(2), सह आर्म अॅक्ट, क्रिमीनल लॉ अमेंटमेंट अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला दरोड्याच्या गुन्ह्यात रविवारी (दि.7) अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांचे घरासमोर दुकान आहे. शनिवारी सकाळी आरोपी दुकानाजवळ आला. तु मला उधार का देत नाही असे म्हणून लोखंडी कोयत्याने अंडे ठेवलेली काचेची बरणी फोडली. तसेच कोयता फिर्यादी यांच्या हाताच्या तळहाताच्या मागे मारुन जखमी केले. तिथून जाताना आरोपीने त्याच्या हातातील लोखंडी कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली. फिर्य़ादी यांना दुकान, घर बंद करुन येथुन निघून जायचं, मी इथला भाई आहे असे म्हणून धमकावले. तर फिर्यादी यांच्या पतीला म्हणाला, माझी माहिती पोलिसांना देतो का, तक्रार केली तर तुला कापून टाकीन अशी धमकी देऊन शिवीगाळ करुन निघून गेला. पुढील तपास पोलीस करीत आहेत. (Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Hit & Run Case | पुणे हिट अँड रन: ऑनड्युटी असलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना उडवलं,
एकाचा मृत्यू तर एक गंभीर

Rain In Lonavala Khandala | लोणावळा, खंडाळ्यात संततधार; पाऊस, धुके अन् पर्यटकांची गर्दी

Sharad Pawar On Devendra Fadnavis | “फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला पण आता…”
शरद पवारांचे मोठे विधान

You may have missed