Pune Crime News | पुणे: राष्ट्रीय स्पर्धेत राखीव खेळाडू म्हणून निवड करण्याच्या आमिषाने फसवणूक, दोघांवर गुन्हा दाखल

Fraud

पुणे : Warje Malwadi Pune Crime News | राष्ट्रीय स्तरावर स्पर्धेत राखीव खेळाडू म्हणून निवड करतो असे अमिष दाखवून व राष्ट्रीय पातळीवर खेळाडू म्हणून खेळाडूचे प्रमाणपत्र देतो असा विश्वास संपादन करुन एका तरुणाची साडेसात लाखांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी (Warje Malwadi Police) दोघा भावांवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पवन ज्ञानोबा म्हस्के (वय-32 रा. चंद्राई बंगलो, तपोधाम परीसर, वारजे) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन अरुण अनंतकवळस (Sachin Arun Ananthakavalas) व त्याचा भाऊ अनंत अरुण अनंतकवळस (Anant Arun Ananthakavalas) यांच्यावर आयपीसी 420, 406, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सन 2019 ते 8 जुलै 2024 या कालावधीत कुर्डुवाडी नगरपरिषद (Kurduwadi Nagar Parishad) येथे घडला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पवन म्हस्के व त्यांचा मित्र
या दोघांची आरोपींसोबत कुर्डुवाडी नगरपरिषदेत ओळख झाली.
त्यांना राष्ट्रीय स्पर्धेत राखीव खेळाडू म्हणून निवड करतो सांगितले.
तसेच खेळाडू म्हणून एखाद्या खेळात खेळवून प्रमाणपत्र देतो असे सांगून विश्वास संपादन केला.
या कामासाठी आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे पैशांची मागणी केली.
आरोपींनी त्यांच्या दोन बँक खात्यावर असलेले साडेसात लाख रुपये आरटीएसद्वारे घेतले.
त्यानंतर त्यांना राखीव खेळाडू म्हणून निवड न करता व न खेळवता आर्थिक फसवणूक केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस आलेकर करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Atal Pension Yojana | ज्येष्ठांना 5000 नव्हे 10000 रुपये पेन्शन देणार सरकार, अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्पात करतील घोषणा?

Tomato Price Hike | वेगाने वाढला टोमॅटोचा दर, 100 रुपये किलोवर पोहोचला, जाणून घ्या कधी होणार स्वस्त?

Ajit Pawar NCP Sabha In Baramati | लोकसभा निवडणुकीत लोकसभा पराभव झालेल्या बारामतीत अजित पवार गटाची भव्य सभा होणार

You may have missed