Congress Mohan Joshi On Traffic Issue In Pune | पुणे शहरातील वाहतुकीच्या खेळखंडोब्याला सरकारच जबाबदार; काँग्रेसकडून मुख्यमंत्री शिंदेंना पत्र

Eknath Shinde

पुणे : Congress Mohan Joshi On Traffic Issue In Pune | पुणे शहरातील वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याचे समोर येत आहे. दरम्यान काँग्रेसकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहून वाहतुकीच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे.

शहरातील वाहतुकीच्या खेळखंडोब्याला सरकारच जबाबदार असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे. शहरांतर्गत प्रवासासाठी पुणेकरांसाठी श्वास असलेल्या पीएमपीएमएल व्यवस्थापक पदाच्या सातत्याने बदल्या करून सरकार सार्वजनिक सेवेबाबत आंपण गंभीर नाही हेच दाखवून देत असल्याचे जोशी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हंटले आहे.

एकाही व्यवस्थापकीय संचालकाला सरकार कार्यकाळ पूर्ण करू देत नाही. शहरातील सार्वजनिक प्रवासासाठी एकमेव असलेल्या या कंपनीचे कामकाज कार्यक्षम व्हावे असे सरकारला वाटतच नाही. खंबीर, कणखर व्यवस्थापकीय संचालक असेल, त्याला पूर्ण कार्यकाळ मिळेल तर तो काहीतरी करेल मात्र सरकार कायमच त्या पदावरील नियुक्तीबाबत धरसोड करीत आहे असे जोशी यांनी पत्रात म्हंटले आहे.

पीएमपीच्या ताफ्यात २ हजार बसगाड्यांची भर घातली जाईल, असे पालकमंत्री अजित पवार यांनी वर्षभरापूर्वी जाहीर केले.
मात्र, त्या दृष्टीने काहीही कार्यवाही झालेली दिसत नाही.
अनेक बस मार्गांवर प्रवाशांना बसची वाट पाहात तासनतास ताटकळत उभे राहावे लागते.
शहराची वस्ती वाढली त्या कारणाने मार्गांची फेररचना करायला हवी आणि त्यासाठी सक्षम प्रमुख अधिकारी प्रदीर्घ काळ तिथे असायला हवा. (Congress Mohan Joshi On Traffic Issue In Pune)

मात्र, त्याकडे लक्ष देण्याऐवजी महायुती सरकार बेजबाबदारपणे वागून पीएमपीच्या कारभाराचा खेळ खंडोबा करत आहे,
असा आरोप मोहन जोशी यांनी केला आहे. कंपनीच्या प्रमुख पदांवरील व्यक्तीला किमान तीन वर्षे तरी बदलू नये,
अशी मागणी जोशी यांनी पत्रात केली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Atal Pension Yojana | ज्येष्ठांना 5000 नव्हे 10000 रुपये पेन्शन देणार सरकार, अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्पात करतील घोषणा?

Tomato Price Hike | वेगाने वाढला टोमॅटोचा दर, 100 रुपये किलोवर पोहोचला, जाणून घ्या कधी होणार स्वस्त?

Ajit Pawar NCP Sabha In Baramati | लोकसभा निवडणुकीत लोकसभा पराभव झालेल्या बारामतीत अजित पवार गटाची भव्य सभा होणार

You may have missed