Pune Crime News | पुणे : शस्त्राचा धाक दाखवून व्यापाऱ्यांकडे मागितली खंडणी, अल्पवयीन चंदननगर पोलिसांच्या ताब्यात

khandani

पुणे : Chandan Nagar Pune Crime News | धारदार शस्त्राचा धाक दाखवून व्यापाऱ्यांकडे खंडणीची मागणी (Demand Of Extortion) करणाऱ्या आणि जबरदस्तीने पैसे उकळणाऱ्या एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police Station) ताब्यात घेतले आहे. हा प्रकार रविवारी (दि.7) दुपारी बाराच्या सुमारास वडगाव शेरी भागातील साईनाथ नगर चौकात (Sainath Nagar Chowk Vadgaon Sheri) घडला आहे. (Extortion Case On Minor)

याबाबत कपिल सांगाराम देव (वय-32 रा. निरबलवाडी, साईनाथनगर, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार, साईनगर येथील अष्टविनायक चौकात राहणाऱ्या 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर भारतीय न्याय संहिता कलम 308(2), 308(5), आर्म अॅक्ट कलम 4(25) नुसार गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे साईनाथ नगर येथे बालाजी होलसेल अँड ट्रेडर्स नावाचे दुकान आहे.

रविवारी दुपारी बाराच्या सुमारास फिर्यादी दुकानात असताना आरोपी अल्पवयीन मुलगा दुकानात आला. त्याने याठिकाणी धंदा करायचा असेल तर मला हप्ता द्यावा लागेल असे म्हणून खंडणी मागितली. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला असता त्याने धारदार शस्त्राचा धाक दाखवून फिर्यादी यांच्याकडून जबरदस्तीने दोनशे रुपये घेतले. तसेच परिसराईत इतर व्यापाऱ्यांकडून देखील खंडणी स्वरुपात पैसे उकळले. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. (Pune Crime News)

तक्रार करण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

हडपसर : घरमालकाच्या मुलाच्या गाडीची धडक बसल्याने त्याला जाब विचारला.
त्यावेळी त्याने शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली.
याबाबत घरमालकाकडे तक्रार करण्यासाठी गेलेल्या तरुणाला दोघांनी मिळून बेदम मारहाण केली.
तर घरमालकाच्या मुलाने लोखंडी वस्तू डोक्यात मारुन जखमी केले.
हा प्रकार शनिवारी (दि.7) रात्री दहाच्या सुमारास कुंजीर वस्ती, मांजरी येथे घडला.
याप्रकरणी ईश्वर विष्णु साळुंके (वय-35 रा. कुंजीर वस्ती, मांजरी)
याने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे.
त्यानुसार बाळासाहेब कुंजीर (वय-50) मुलगा आप्पा बाळासाहेब कुंजीर (वय-22 दोघे रा. कुंजीर वस्ती, मांजरी)
यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Atal Pension Yojana | ज्येष्ठांना 5000 नव्हे 10000 रुपये पेन्शन देणार सरकार, अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्पात करतील घोषणा?

Tomato Price Hike | वेगाने वाढला टोमॅटोचा दर, 100 रुपये किलोवर पोहोचला, जाणून घ्या कधी होणार स्वस्त?

Ajit Pawar NCP Sabha In Baramati | लोकसभा निवडणुकीत लोकसभा पराभव झालेल्या बारामतीत अजित पवार गटाची भव्य सभा होणार

You may have missed