Vasant More Join Uddhav Thackeray Shivsena | वसंत मोरेंची ठाकरे गटात घरवापसी; उद्धव ठाकरे म्हणाले – ‘एकेकाळी पुण्यात होते शिवसेनेचे 5 आमदार…’
पुणे : Vasant More Join Uddhav Thackeray Shivsena | मनसेला रामराम करून वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवणारे पुण्याचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी पदाधिकाऱ्यांसह उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. वसंत मोरे यांच्या पक्षप्रवेशाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुण्यात मोठं राजकीय बळ मिळालं आहे. मातोश्री निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी खासदार संजय राऊत (Sanjay Raut), आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) हे ही उपस्थित होते.
यानंतर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ” शिवसैनिकच परतले आहेत, त्यामुळं काय बोलावं हे कळत नाहीये. पण वसंत मोरे आणि त्यांचे सहकारी हे मूळचे शिवसैनिक आहेत याचं समाधान आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीही आमचं वसंत मोरे यांच्यावर लक्ष होतं. ते काय करतात हे बघत होतो. मधल्या काळात ते वाट चुकले होते असं मी म्हणणार नाही. पण शिवसेनेच्या बाहेर इतर पक्षात काय वागणूक मिळते? किती मानसन्मान मिळतो? मिळतो का? याचा अनुभव वसंत मोरे यांनी घेतला आहे. ते आता परिपक्व होऊन आले आहेत. त्यांचं महत्त्व आणि जबाबदारी आता मोठी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. (Vasant More Join Uddhav Thackeray Shivsena)
ते पुढे म्हणाले, ” एकेकाळी पुण्यात शिवसेनेचे पाच आमदार होते.
तो काळ पुन्हा आणायचा आहे. पुणे भगवामय करायचं आहे.
लोकसभा निवडणुकीत लोकशाही वाचवण्याची, संविधान वाचवण्याची जबाबदारी होती.
शिवरायांचा महाराष्ट्र या लढाईत सर्वात पुढं होता. महाराष्ट्रानं देशाला दिशा दाखवली.
येणाऱ्या विधानसभेत जी लढाई होणार आहे ती लाचारी, गद्दारी आणि खोकेबाजीची लढाई होणार आहे.
त्यात पुणे म्हटल्यानंतर क्रांती आणि विद्येचं माहेरघर आहे.
त्यामुळं सत्ताबदलाचा पाया पुण्यातच घातला गेला पाहिजे, अशी अपेक्षाही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Tomato Price Hike | वेगाने वाढला टोमॅटोचा दर, 100 रुपये किलोवर पोहोचला, जाणून घ्या कधी होणार स्वस्त?