Love Birds Cafe Ravet | पिंपरी: ‘लव बडर्स’ कॅफेमध्ये मुला मुलींचे अश्लिल चाळे; कॅफे चालक-मालकावर गुन्हा दाखल

Love Birds

पिंपरी : Love Birds Cafe Ravet | पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत येथील ‘लव बडर्स’ कॅफेवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Pimpri Chinchwad Crime Branch) सोमवारी(दि. 8) कारवाई केली. यावेळी कॅफेमधील पडदे लावुन पार्टीशन केलेल्या जागेत शिक्षण घेत असलेल्या मुला मुलींना एकांतात बसण्यासाठी व अश्लील चाळे व असभ्य वर्तन करण्यासाठी जगा उपलब्ध करुन दिल्याचे आढळून आले. याप्रकरणी संबंधित चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाच्या (Pimpri Chinchwad AHTU) पोलीस हवालदार संगीता जाधव (वय-37) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कॅफे चालक धिरज प्रकाश मोहिते Dhiraj Prakash Mohite (वय-22 रा. विरंगुळा सोसायटी, वाकड), कॅफे मालक भाग्यश्री लक्ष्मण ढाकणे Bhagyashree Laxman Dhakne (वय-34 रा. काटकरवाडी, अंबाजोगाई, उजणी जि. बीड) यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या (Pimpri Chinchwad Crime Branch) अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाला माहिती मिळाली की, रावेत येथील डीवाय पाटील रोडवरील पवणी प्राईड मधील शॉप नंबर 6 मध्ये असलेल्या ‘लव बडर्स’ कॅफे मध्ये मुला-मुलींना एकांतात भेटण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली जात आहे. याठिकाणी मुलं आणि मुली अश्लील चाळे व असभ्य वर्तन करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने मिळालेल्या माहितीची पडताळणी केली. (Love Birds Cafe Ravet)

पोलिसांनी केलेल्या तपासात ‘लव बडर्स’ कॅफे शॉपचा कोणताही परवाना आरोपींकडे नाही.
तसेच सार्वजनिक ठिकाणी ‘लव बडर्स’ कॅफी शॉपचा बोर्ड लावून खाद्य पदार्थ विक्री करत होते.
पथकाने शॉपची पाहणी केली असता कॉफी शॉपच्या पहिल्या मजल्यावरील रुमध्ये 3 X 3 लांबी रुंदीचे प्लायवुडचे व
पाच फूट उंचीचे पाच कप्पे दिसून आले.
या कप्प्यांना बाहेरच्या बाजूने पडदे लावून आतमध्ये बसण्यासाठी सोफा ठेवले होते.
यामध्ये महाविदयालयीन मुला मुलींना बसण्यासाठी व अश्लील चाळे व बेशिस्त वर्तन करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिल्याचे निदर्शनास आले.
त्यानुसार पोलिसांनी कॅफे चालक व मालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Atal Pension Yojana | ज्येष्ठांना 5000 नव्हे 10000 रुपये पेन्शन देणार सरकार, अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्पात करतील घोषणा?

Tomato Price Hike | वेगाने वाढला टोमॅटोचा दर, 100 रुपये किलोवर पोहोचला, जाणून घ्या कधी होणार स्वस्त?

Ajit Pawar NCP Sabha In Baramati | लोकसभा निवडणुकीत लोकसभा पराभव झालेल्या बारामतीत अजित पवार गटाची भव्य सभा होणार

You may have missed