Sharad Pawar NCP | माझ्या संपर्कात कोणीही नाही पण…”; पक्षात येणाऱ्या इच्छुकांवर शरद पवारांचे सूचक विधान
पुणे : Sharad Pawar NCP | आगामी विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Assembly Election 2024) सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीसाठी सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला मोठे यश मिळाले होते. त्यानंतर अजित पवार गटातून अनेक पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. दरम्यान अजित पवार गटातील (Ajit Pawar NCP) काही आमदार शरद पवार गटात प्रवेश करणार अशी चर्चा सुरु असताना शरद पवारांनी सूचक विधान केले आहे.
माध्यमांशी बोलताना शरद पवारांनी अनेक विषयांवर भाष्य केले. राज्य सरकारने योजना जाहीर केल्या परंतु, माझा अनुभव आहे की अंदाजपत्रक मांडल्यानंतर सहा महिन्यांनी पुरवणी मागण्या मांडल्या जातात पण इथे केवळ ८ दिवसात पुरवण्या मागण्या मांडल्या आहेत. शासनाकडे असलेला निधी आणि घोषित केलेल्या योजना यात खूप अंतर दिसते. मुलींच्या मोफत शिक्षणाचा निर्णय चांगला आहे. असे असले तरीही संपूर्ण राज्यात ही योजना पार पाडता येईल का? याबाबत शरद पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पवार म्हणाले, “आम्हाला लोकसभेला तुतारी (Tutari) आणि पिपाणी या चिन्हामुळे फटका बसला. सध्या आमचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे, आम्ही स्थापन केलेला पक्ष आणि चिन्ह वेगळी भूमिका घेतलेल्या लोकांना देण्यात आले. हे सगळे प्रकरण कोर्टात आहे. पुढील आठवड्यात त्याची सुनावणी आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षासाठी स्वखुशीने देणगी स्वीकारण्याचा दिलेला निर्णय आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.
दरम्यान, राज्य सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेचे (Majhi Ladki Bahin Yojana) स्वागत शरद पवारांनी केले.
परंतु, या योजनेच्या अंमलबजावणीबाबत साशंकता बोलून दाखवली.
तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक असलेल्यांबाबत बोलताना शरद पवार म्हणाले
की, माझ्या संपर्कात कोणीही नाही, मी त्याच्यात लक्षही देत नाही.
जयंत पाटील यांना ते लोक भेटतात, याची माहिती मला आहे.
त्याच्यावर आऊटकम काय येईल हे उद्याचे मतदान झाल्यावर कळेल.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Tomato Price Hike | वेगाने वाढला टोमॅटोचा दर, 100 रुपये किलोवर पोहोचला, जाणून घ्या कधी होणार स्वस्त?