ACB File FIR On Sanjaykumar Shashikant Kokane | बीड : लाचखोर कार्यकारी अभियंत्याकडे आढळली 3 कोटीची बेहिशोबी मालमत्ता
बीड : ACB File FIR On Sanjaykumar Shashikant Kokane | अंबाजोगाई येथे 2022 मध्ये कार्यरत असलेल्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता संजयकुमार शशिकांत कोकने Sanjaykumar Kokane (वय 51 सध्या कार्यकारी अभियंता विकास विभाग क्रमांक चार अंधेरी मुंबई) यांना 22 फेब्रुवारी 2022 रोजी लाच घेताना पकडण्यात आले होते. या प्रकरणात अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या मालमत्तेच्या उघड चौकशीचे आदेश देण्यात आले होते. चौकशीमध्ये पती-पत्नी कडे तीन कोटीची अपसंपदा आढळून आल्याने दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. (Beed ACB Bribe Case)
संजयकुमार शशिकांत कोकने (वय 51), ज्योती संजकुमार कोकणे (दोघे रा.पाखल रोड.नाशिक) यांच्या विरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात 13(1)(ब) व 13(2),12 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उप अधीक्षक शंकर किसनराव शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. (ACB File FIR On Sanjaykumar Shashikant Kokane)
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोकणे यांच्या मालमत्तेची चौकशी केली असता त्यांनी परीक्षण कालावधीमध्ये म्हणजे 01/09/2010 ते 22/06/2022 दरम्यान कायदेशीर मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा 238.84 टक्के अधिकची अपसंपदा संपादित केली असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या पत्नी व स्वत:च्या नावे 3 कोटी 2 लाख 64 हजार रुपयांची अपसंपदा संपादित केल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक युनुस शेख करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक मुकुंद अघाव, पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड पथकाने केली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Tomato Price Hike | वेगाने वाढला टोमॅटोचा दर, 100 रुपये किलोवर पोहोचला, जाणून घ्या कधी होणार स्वस्त?