Pune Crime News | पुणे: गाडीत बसण्यास नकार दिल्याने अश्लील शिवीगाळ करुन असभ्य वर्तन, एकाला अटक

Molestation

पुणे : Chandan Nagar Pune Crime News | महिलेजवळ चारचाकी गाडी थांबवून तिला गाडीत बसण्यास सांगितले. मात्र, महिलेने गाडीत बसण्यास नकार दिल्याने तिला अश्लील शिवीगाळ करुन असभ्य वर्तन करुन विनयभंग केला (Molestation Case). याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police Station) एका युवकावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.8) सकाळी आठच्या सुमारास खराडी परिसरात घडला आहे.

याबाबत 35 वर्षीय महिलेने मंगळवारी (दि.9) चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अंकुश रावसाहेब भिसे Ankush Raosaheb Bhise (वय-32 रा.राजाराम पाटील नगर, गल्ली नं. 3 खराडी, पुणे) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 75, 78, 351(2) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सोमवारी सकाळी आठच्या सुमारास खरडी येथील सार्वजनिक रोडवरुन जात होती. त्यावेळी आरोपी अंकुश भिसे याने त्याच्या चारचाकी गाडीतून महिलेचा पाठलाग केला.

दुध डेअरी समोर महिलेला अडवून त्यांचा हात पकडून गाडीत बसण्यास सांगितले. मात्र, महिलेने गाडीत बसण्यास नकार दिला. याचा राग आल्याने आरोपीने महिलेला अश्लील बोलून अश्लील शिवीगाळ करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. महिला गाडीत बसत नसल्याने आरोपीने गाडीतून खाली उतरून गाडीने उडवण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. (Pune Crime News)

महिलेसोबत असभ्य वर्तन

पुणे : महिलेच्या मोबाईलवर वारंवार फोन करुन संबंध ठेवण्याची मागणी केली.
तसेच संबंध ठेवले नाहीतर बघून घेण्याची धमकी दिली.
याप्रकरणी 40 वर्षीय व्यक्तीवर मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police Station) गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत 31 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपी आणि पिडित महिला एकमेकांचे नातेवाईक आहेत.
आरोपीने महिलेला घरी बोलवून तिच्यासोबत अश्लील वर्तन केले. याबाबत महिलेने आरोपीच्या मुलीला सांगितले.
याचा राग आल्याने आरोपीने महिलेसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Atal Pension Yojana | ज्येष्ठांना 5000 नव्हे 10000 रुपये पेन्शन देणार सरकार, अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्पात करतील घोषणा?

Tomato Price Hike | वेगाने वाढला टोमॅटोचा दर, 100 रुपये किलोवर पोहोचला, जाणून घ्या कधी होणार स्वस्त?

Ajit Pawar NCP Sabha In Baramati | लोकसभा निवडणुकीत लोकसभा पराभव झालेल्या बारामतीत अजित पवार गटाची भव्य सभा होणार

You may have missed