Spicejet Airline ने केली मोठी गडबड, दोन वर्षापासून भरला नाही एकाही कर्मचाऱ्याचा PF, पैशाच्या तुटवड्याने एयरलाईन्स अडचणीत

Spicejet Airline

नवी दिल्ली : Spicejet Airline | कधी गैरवर्तणुकीमुळे तर कधी कामाच्या पद्धतीने टीका होत असलेली एयरलाईन स्पाईसजेट आर्थिक संकटातून जात आहे. माफक दरात हवाई प्रवास देणारी एयरलाईन्स मोठ्या आर्थिक संकटाला तोंड देत आहे. स्पाईजसेटने पुन्हा एकादा मोठी चूक केली आहे. या कंपनीने सुमारे अडीच वर्षापासून आपल्या कोणत्याही कर्मचाऱ्याचा पीएफ जमा केलेला नाही. ईपीएफओने सुद्धा याबाबत आश्चर्यकारक मौन बाळगले होते, मात्र आरटीआयमधून ही माहिती समोर आली.

कर्मचाऱ्यांची फसवणूक
स्पाईसजेट कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफ कापत होती, पण ते पैसे ईपीएफओमध्ये जमा करत नव्हती. ईपीएफओने एका आरटीआयच्या उत्तरात हा खुलासा केला आहे. या रिपोर्टनुसार, स्पाईसजेटने २०२२ पासूनच ईपीएफओमध्ये योगदान बंद केले होते.

कंपनीला याबाबत अनेकदा ईपीएफओकडून नोटीस आणि समन्स पाठवले गेले, परंतु कंपनीकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

आरटीआयनुसार, स्पाईसजेटने जानेवारी २०२२ मध्ये ११,५८१ कर्मचाऱ्यांचा शेवटचा पीएफ जमा केला होता. यानंतर एयरलाईनकडून सातत्याने पीएफ चुकवण्यात आला. याबाबत स्पाईसजेटकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. स्पाईसजेट एयरलाईन अवघड आर्थिक संकटातून जात आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Reliance Retail | अनंतच्या विवाहापूर्वी नवीन बिझनेस सुरू करण्याची तयारी,
‘या’ व्यवसायात एंट्री करणार मुकेश अंबानी, चीनची कंपनी आणणार भारतात

Pune Crime News | पुणे: गाडीत बसण्यास नकार दिल्याने अश्लील शिवीगाळ करुन असभ्य वर्तन, एकाला अटक

Gautam Gambhir | गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक, जय शाहांची घोषणा

Pune Bopodi Hit & Run Case | पुणे पोलीस हवालदार मृत्यू प्रकरण : कारमधील तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात,
कारला ओव्हरटेक केल्याचा आला राग, भरधाव वेगात कार चालवली अन्…

You may have missed