Swargate Pune Hit & Run Case | पुण्यात पुन्हा हिट अँड रनचा प्रकार ! भरधाव वाहनाच्या धडकेत CA तरुणाचा मृत्यू; स्वारगेट परिसरातील धक्कादायक घटना

Pune Accident Cases | Friday and Saturday 8 pm to 3 am is the most dangerous time for Punekars; 36 percent of fatal accidents occur on Pune roads during this time, 54 percent of accidents are in the hit and run category

पुणे : Swargate Pune Hit & Run Case | पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर शहरामध्ये हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बोपोडीत एका भरधाव कारने दुचाकीला धडक देऊन दोन पोलीस कर्मचाऱ्यांना उडवले (Bopodi Pune Hit & Rund Case). यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला (Policeman Died In Accident). ही घटना ताजी असतानाच स्वारगेट परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत CA तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.9) सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास स्वारगेट चौकातील सारसबाग कडे (Sarasbaug Pune) जाणाऱ्या अंडर ग्राऊंड रोडवर घडली. (CA Died In Accident At Swargate)

सागर सुरेश मंत्री Sagar Suresh Mantri (वय 34, रा. अक्षर अल्टोरिअस पार्क, हडपसर) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत मयत सागर याचा मावस भाऊ नयन सतिश भनसाळी (वय-27 रा. पवळे चौक, कसबा पेठ, पुणे) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर भारतीय न्याय संहिता कलम 281, 106(1), मोटार वाहन कायदा कलम 184, 119/177, 134(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट चौकातील सारसबाग कडे जाणाऱ्या अंडर ग्राऊंड रोडवर अपघात झाल्याची माहिती मिळताच स्वारगेट पोलीस ठाण्यातील तसेच स्वारगेट वाहतूक शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी सागर जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने डेक्कन परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सागरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून हॉस्पिटल येथे पाठवून दिला.

सागर मंत्री हे सीए होते. त्यांचे भवानी पेठ परिसरात ऑफिस आहे. ते सीए फर्म चालवीत होते.
नेहमीप्रमाणे सागर हडपसर येथून ऑफिसला जात होते. त्यावेळी हा अपघात झाला.
सागरच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. त्यामुळे रक्तस्त्राव झाला होता.
त्यांच्या दुचाकीचे मागील बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
त्यामुळे अज्ञात वाहनाने त्यांना पाठीमागून धडक दिल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बावचे (API Ashwini Bavche) करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Reliance Retail | अनंतच्या विवाहापूर्वी नवीन बिझनेस सुरू करण्याची तयारी,
‘या’ व्यवसायात एंट्री करणार मुकेश अंबानी, चीनची कंपनी आणणार भारतात

Pune Crime News | पुणे: गाडीत बसण्यास नकार दिल्याने अश्लील शिवीगाळ करुन असभ्य वर्तन, एकाला अटक

Gautam Gambhir | गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक, जय शाहांची घोषणा

Pune Bopodi Hit & Run Case | पुणे पोलीस हवालदार मृत्यू प्रकरण : कारमधील तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात,
कारला ओव्हरटेक केल्याचा आला राग, भरधाव वेगात कार चालवली अन्…

You may have missed