Attack On Policeman In Pune | पुण्यात पोलिसच असुरक्षित? गाडी अडवल्याच्या रागातून पोलिसाला बेदम मारहाण, दोघांना अटक

police

पुणे : Attack On Policeman In Pune | सुसंस्कृत शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात गुन्हेगारी वाढत आहे. खून, दरोडा, जबरी चोरी यासारख्या घटना उघडकीस येत आहे. आता पुणे शहर सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे तेच पोलीस देखील असुरक्षित असल्याचे मागिल काही दिवसांपसून घडत असलेल्या घटनांवरुन दिसून येत आहे. पुण्यातील मध्यवस्तीत ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई दरम्यान वाहतूक शाखेच्या महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याला जाळून मारण्याचा प्रयत्न केला. तर बोपोडी मध्ये मद्यपान करुन भरधाव वेगात कार चालवणाऱ्या व्यक्तीने दोन पोलीस कर्मचाऱ्यांना उडवले. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. यातच आता सिंहगड रोड रस्त्यावर वाहतुक नियमन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला गाडी अडवल्याच्या कारणावरुन बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी मंगेश शिवाजी फडके (Mangesh Shivaji Phadke) आणि बापू रोहिदास दळवी (Bapu Rohidas Dalvi) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 121 (1), 132, 351 (2), 351 (3), 352 नुसार हवेली पोलीस ठाण्यात (Haveli Police Station) गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

पुण्यातील सिंहगड रस्त्यावर कोल्हेवाडी फाटा (Kolhewadi Phata Sinhagad Road) येथे चेक पॉईंटवर वाहतुकीचे नियोजन करत असणाऱ्या पोलीस अंमलदार ऋषिकेश गायकवाड यांनी दोघांना त्यांच्या गाड्या बाजूला घेण्यास सांगितले. यावरून संतापलेल्या मंगेश फडके आणि रोहिदास दळवी यांनी त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. मी कोण आहे? तुला माहीत नाही? तू नोकरी कशी करतो तेच बघतो, असं म्हणत दोघांनी पोलीस अंमलदार ऋषिकेश गायकवाड धमकावत मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी गायकवाड यांच्या मदतीसाठी गेलेले दुसरे पोलीस कर्मचारी यांना देखील आरोपींनी मारहाण केली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Attack On Policeman In Pune)

पोलीस म्हटले की भल्याभल्यांना घाम फुटतो. परंतु आता याच खाकीची पुण्यात भीती राहिली नाही की काय असा प्रश्न समोर आला आहे.
पुण्यात एकडीकडे अंमली पदार्थांची विक्री, वाढते अपघात, कोयते घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार घडत आहे.
पोलीस कठोर कारवाई करुन गुन्हेगारांवर वचक बसवण्याचा प्रयत्न करत आहेत.
मात्र, दुसऱ्या बाजूला याच पोलिसांवर वारंवार हल्ले होत असल्याचे पहायला मिळत आहे.
वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे पुणे सुरक्षित आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य पुणेकरांना पडला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Reliance Retail | अनंतच्या विवाहापूर्वी नवीन बिझनेस सुरू करण्याची तयारी,
‘या’ व्यवसायात एंट्री करणार मुकेश अंबानी, चीनची कंपनी आणणार भारतात

Pune Crime News | पुणे: गाडीत बसण्यास नकार दिल्याने अश्लील शिवीगाळ करुन असभ्य वर्तन, एकाला अटक

Gautam Gambhir | गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक, जय शाहांची घोषणा

Pune Bopodi Hit & Run Case | पुणे पोलीस हवालदार मृत्यू प्रकरण : कारमधील तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात,
कारला ओव्हरटेक केल्याचा आला राग, भरधाव वेगात कार चालवली अन्…

You may have missed