Post Office Savings Schemes | FD पेक्षा जास्त रिटर्नसाठी Post Office Scheme वर टाका एक नजर, येथे जाणून घ्या व्याजदर आणि मॅच्युरिटीच्या डिटेल्स
नवी दिल्ली : Post Office Savings Schemes | पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये (Post Office Schemes) बँकेपेक्षा जास्त व्याज (Bank FD) मिळत असल्याने अनेक लोकांना त्या योजना आवडतात. येथे जास्त व्याजदर मिळतो आणि जोखीम देखील नसते. विना जोखीम बचत करायची असेल तर या योजनांमध्ये तुम्ही करू शकता. पोस्ट ऑफिस योजनांचे वैशिष्ट म्हणजे येथे दर तिमाहीला व्याज दर बदलतो. अशा काही योजनांची माहिती जाणून घेऊया…
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)
६० वर्षावरील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये एकरकमी गुंतवणूक करावी लागते. कमला ३० लाखापर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेत प्राप्तीकर कायदा कलम ८०सी अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो.
- व्याजदर – सध्या ८.२ टक्के.
- मॅच्युरिटी पीरियड – ५ वर्षे. ५ वर्षानंतर पुढे वाढवता येते.
किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra)
किसान विकास पत्र एक बचत प्रमाणपत्र आहे. यात हमी परतावा मिळतो. या योजनेत कर सलवत मिळत नाही. या योजनेत गुंतवणुकीची कोणतीही कमाल मर्यादा नाही.
व्याजदर – ७.५ टक्के वार्षिक चक्रवाढ वाजदर आहे.
मॅच्युरिटी पीरियड – ११५ महिने (९ वर्षे ७ महिने)
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (MIS)
या योजना किमान वार्षिक १५०० रुपये आणि कमाल ९ लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. गुंतवलेल्या रक्कमेवर मिळालेल्या उत्पन्नावर कर लागतो. या योजनेत व्याज दर महिन्याला दिले जाते.
व्याजदर – ७.४ टक्के वार्षिक
मॅच्युरिटी पीरियड – ५ वर्षे
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Reliance Retail | अनंतच्या विवाहापूर्वी नवीन बिझनेस सुरू करण्याची तयारी,
‘या’ व्यवसायात एंट्री करणार मुकेश अंबानी, चीनची कंपनी आणणार भारतात
Pune Crime News | पुणे: गाडीत बसण्यास नकार दिल्याने अश्लील शिवीगाळ करुन असभ्य वर्तन, एकाला अटक
Gautam Gambhir | गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक, जय शाहांची घोषणा
Pune Bopodi Hit & Run Case | पुणे पोलीस हवालदार मृत्यू प्रकरण : कारमधील तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात,
कारला ओव्हरटेक केल्याचा आला राग, भरधाव वेगात कार चालवली अन्…