Sharad Pawar NCP Vs Ajit Pawar NCP | ठरलं ! अजित पवारांचे 40 नेते शरद पवार गटात प्रवेश करणार; ‘या’ तारखेला होणार प्रवेश
चिंचवड : Sharad Pawar NCP Vs Ajit Pawar NCP | आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राजकीय गणितं बदलताना दिसत आहेत. शरद पवारांनी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मोर्चेबांधणी सुरु केलेली आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाच्या तुलनेत शरद पवार गटाला मोठे यश मिळाले आहे. १० पैकी ८ जागांवर खासदार निवडून आल्याने शरद पवार गटाचा आत्मविश्वास वाढला आहे. दरम्यान पक्षप्रवेश वाढल्याचे चित्र आहे. अजित पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमधून (Pimpri Chinchwad) अजित पवार गटात येण्यास अनेकजण इच्छुक आहेत.
काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड मधून मोठ्या संख्येने माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर पिंपरी चिंचवड मधून मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला खिंडार पडणार हे जवळपास निश्चित झालं होतं. पिंपरी चिंचवड हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो.
याच पिंपरी चिंचवड मधून अजित पवारांसोबत असलेले ४० नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी २० जुलै ची तारीख निश्चित करण्यात आली आहे. अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या पक्षप्रवेशामुळे शरद पवार गटाची ताकद वाढणार आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Reliance Retail | अनंतच्या विवाहापूर्वी नवीन बिझनेस सुरू करण्याची तयारी,
‘या’ व्यवसायात एंट्री करणार मुकेश अंबानी, चीनची कंपनी आणणार भारतात
Pune Crime News | पुणे: गाडीत बसण्यास नकार दिल्याने अश्लील शिवीगाळ करुन असभ्य वर्तन, एकाला अटक
Gautam Gambhir | गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक, जय शाहांची घोषणा
Pune Bopodi Hit & Run Case | पुणे पोलीस हवालदार मृत्यू प्रकरण : कारमधील तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात,
कारला ओव्हरटेक केल्याचा आला राग, भरधाव वेगात कार चालवली अन्…