Amol Kolhe On Devendra Fadnavis | दिल्लीतील भाजपा वरिष्ठांकडून देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रयत्न; अमोल कोल्हेंचा दावा
मुंबई : Amol Kolhe On Devendra Fadnavis | आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) महायुतीची (Mahayuti) धुरा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडेच सोपवण्यात येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालेली आहे. तर दुसरीकडे फडणवीसांची केंद्रातून कोंडी केली जात असल्याचीही चर्चा आहे. मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) चर्चा करण्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते उपस्थित राहिले नाहीत. यावरून आज सभागृहात गोंधळ झाला. याबाबत खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना फडणवीसांबाबत मोठा दावा केला आहे.
अमोल कोल्हे म्हणाले,” सरकारने जनतेत संभ्रम पसरवू नये. महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट असून यातून सक्षम तोडगा काय तो समोर आणावा. मागेच मुख्यमंत्री यांचा आरक्षणाबाबत व्हिडिओ समोर आला होता. आपण काय बोलायचे आणि निघून जायचे, यामध्ये त्यांची काय भूमिका आहे समजणे गरजेचे आहे. सर्व घटकांना योग्य न्याय मिळेल असा तोडगा सरकारने काढणे गरजेचे आहे, असे कोल्हे यांनी म्हंटले आहे.
विरोधकांना राज्यात अशांतता राहावी, असे वाटत असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. यावर बोलताना अमोल कोल्हे यांनी सांगितले की, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. राज्यात सरकार महायुतीचे आहे, त्यांनी आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्यांनीच आरक्षणाचा प्रश्न भिजत ठेवला आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले.
तसेच मुंबईतील काही स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव देण्यात आला. यावर बोलताना, भाजपा सरकारमध्ये नावे बदलणे, हेच धोरण दिसत आहे. नावे बदलून शहरात पाणी साचायचे थांबत नाही, विमानतळाचे छत कोसळणे थांबत नाही, रेल्वेचे अपघात थांबत नाही. त्यामुळे रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यापेक्षा नागरिकांना सुविधा मिळणे महत्त्वाचे आहे, अशी टीका अमोल कोल्हेंनी केली. (Amol Kolhe On Devendra Fadnavis)
दरम्यान, आगामी विधानसभेची निवडणूक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढवली जाणार होती.
परंतु, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढली जाण्याची शक्यता आहे.
यावर अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
त्यावेळी ते म्हणाले, दिल्लीतील भाजपा वरिष्ठांकडून देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटण्याचा हा प्रकार आणि प्रयत्न आहे.
तसेच हा महायुतीचा अंतर्गत मुद्दा आहे, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Reliance Retail | अनंतच्या विवाहापूर्वी नवीन बिझनेस सुरू करण्याची तयारी,
‘या’ व्यवसायात एंट्री करणार मुकेश अंबानी, चीनची कंपनी आणणार भारतात
Pune Crime News | पुणे: गाडीत बसण्यास नकार दिल्याने अश्लील शिवीगाळ करुन असभ्य वर्तन, एकाला अटक
Gautam Gambhir | गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक, जय शाहांची घोषणा
Pune Bopodi Hit & Run Case | पुणे पोलीस हवालदार मृत्यू प्रकरण : कारमधील तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात,
कारला ओव्हरटेक केल्याचा आला राग, भरधाव वेगात कार चालवली अन्…