Bombay Stock Exchange | 149 वर्षांचा आहे BSE चा इतिहास, मनोरंजक आहे ट्रेडिंगच्या सुरुवातीची कहाणी…

sensex

नवी दिल्ली : ज्याप्रमाणे देशाचे स्वातंत्र्य सोपे नव्हते, त्याच प्रमाणे शेयर बाजारचा प्रवाससुद्धा सोपा नव्हता. एका छोट्या भारतात एका वडाच्या झाडाखाली शेयर बाजाराला सुरुवात झाली होती. भारतीय शेयर बाजारचा इतिहास खुप जुना आहे. भारतीय शेयर बाजारात अनेक स्टॉक एक्सचेंज आहेत, परंतु बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange) चा इतिहास आपण जाणून घेऊया…

आजपासून १४९ वर्षापूर्वी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange) ची स्थापना झाली होती. जे आता सेन्सेक्स (Sensex) च्या नावाने ओळखले जाते.

सध्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आशियामध्ये वेगाने वाढणारे स्टॉक एक्सचेंज आहे. ते ग्लोबल शेयर मार्केटमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचले आहे. तर, मार्केट कॅपिटलायजेशन नुसार बीएसई जगातील ११वे सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज आहे.

१८५० मध्ये सेन्सेक्सची सुरुवात वडाच्या झाडाखाली झाली होती. या झाडाखाली चार गुजराती आणि एक पारसी व्यक्तीने ट्रेडिंग सुरू केली आणि नंतर व्यवसायिकांची संख्या वाढू लागली. मुंबईतील चर्चगेट परिसरात हार्निमन सर्कलच्या टाऊनहॉल जवळ हे झाड होते. येथेच सर्व दलाल जमत असत आणि शेयरची खरेदी-विक्री करत असत.

१८५५ मध्ये जेव्हा दलालांची संख्या वाढू लागली तेव्हा एक ऑफिस खरेदी करण्यात आले, ज्याला आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या नावाने ओळखले जाते. काळासोबतच दलालांची संख्या वाढली आणि मेडोज स्ट्रीट आणि एमजी रोड हे दलाल स्ट्रीट झाले. आता या रोडला दलाल स्ट्रीट (Dalal Street) म्हटले जाते.

१९७५ मध्ये द नेटीव्ह शेयर अँड स्टॉक ब्रोकर्स असोशियसनची स्थापना करण्यात आली. यात अधिकृतपणे शेयर बाजार (Share Market) ची सुरुवात मानले जाते. यावेळी ३१८ लोकांनी १ रुपया प्रवेश शुल्कासह या संस्थेचे गठण केले होते.

व्यवसायिक प्रेमचंद रायचंद जैन यांना बीएसईचे जनक बॉम्बेच्या कॉटन किंगच्या नावाने ओळखले जाते.
देशाच्या स्वातंत्र्याच्या १० वर्षानंतर म्हणजे १९५७ मध्ये भारत सरकारने सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन अ‍ॅक्ट
अंतर्गत बीएसईला मान्यता दिली होती. यानंतर अधिकृतपणे BSE Sensex सुरू झाला.

बीएसई सेन्सेक्सचे बेस ईयर १९७८-७९ आणि बेस पॉइंट १०० अंक आहे.
आज बीएसई सेन्सेक्स ८०,००० अंकावर पोहोचला आहे.

१९९२ मध्ये सेन्सेक्सने ३०० टक्के वाढ नोंदवली. हा बिग बुल हर्षद मेहताचा काळा होता.
पण तेजी जास्त काळ राहिली नाही.
हर्षद मेहताचा घोटाळा बाहेर येताच सेन्सेक्स सोबत इतर स्टॉक एक्सचेंजमध्ये मोठी घसरण झाली.

२०१४ मध्ये बीएसईचे एम-कॅप पहिल्यांदा १०० लाख कोटीच्या पुढे गेले.
जून २०२१ मध्ये पुन्हा एकदा बाजारात तेजी आली बीएसईचे बाजार भांडवल ७ कोटी रुपयांच्या पुढे गेले.

डिसेंबर २०२३ मध्ये आलेल्या तेजीनंतर बीएसईचे एम-कॅप ४ ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Reliance Retail | अनंतच्या विवाहापूर्वी नवीन बिझनेस सुरू करण्याची तयारी,
‘या’ व्यवसायात एंट्री करणार मुकेश अंबानी, चीनची कंपनी आणणार भारतात

Pune Crime News | पुणे: गाडीत बसण्यास नकार दिल्याने अश्लील शिवीगाळ करुन असभ्य वर्तन, एकाला अटक

Gautam Gambhir | गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक, जय शाहांची घोषणा

Pune Bopodi Hit & Run Case | पुणे पोलीस हवालदार मृत्यू प्रकरण : कारमधील तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात,
कारला ओव्हरटेक केल्याचा आला राग, भरधाव वेगात कार चालवली अन्…

You may have missed