Talegaon Dabhade Nagar Parishad | दाभाडे येथील मुख्याधिकारी यांच्या कारकिर्दीतील कारभाराच्या चौकशीसाठी समिती; मंत्री उदय सामंत यांची माहिती
मावळ: Talegaon Dabhade Nagar Parishad | तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निगण्णा कल्लण्णा पाटील (N.K. Patil) यांच्या विरोधातील तक्रारीनुसार त्यांना निलंबित करण्यात आले आहे. संबंधित मुख्याधिकारी यांच्या कारकिर्दीतील सर्व कारभाराची चौकशी करण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवा व भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी लक्षवेधी सुचनेच्या उत्तरात सांगितले.
विधानसभेत याबाबत आमदार सुनील शेळके (MLA Sunil Shelke) यांनी लक्षवेधी मांडली होती. या सूचनेच्या चर्चेमध्ये सदस्य मनीषा चौधरी यांनीही सहभाग घेतला होता. सामंत पुढे म्हणाले की, मुख्याधिकारी यांच्या तक्रारीबाबत उपविभागीय अधिकारी, मावळयांच्याकडून चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे. तसेच संबंधित मुख्याधिकारी यांनी १ जून २०२४ रोजी मद्यप्राशन करीत वाहन चालवीत अपघात केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Talegaon Dabhade Nagar Parishad)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Reliance Retail | अनंतच्या विवाहापूर्वी नवीन बिझनेस सुरू करण्याची तयारी,
‘या’ व्यवसायात एंट्री करणार मुकेश अंबानी, चीनची कंपनी आणणार भारतात
Pune Crime News | पुणे: गाडीत बसण्यास नकार दिल्याने अश्लील शिवीगाळ करुन असभ्य वर्तन, एकाला अटक
Gautam Gambhir | गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक, जय शाहांची घोषणा
Pune Bopodi Hit & Run Case | पुणे पोलीस हवालदार मृत्यू प्रकरण : कारमधील तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात,
कारला ओव्हरटेक केल्याचा आला राग, भरधाव वेगात कार चालवली अन्…