Stock Market Revenge Trading | शेयर मार्केटच्या ‘रिव्हेंज ट्रेडिंग’ने घेतला पिता-पुत्राचा बळी, ३ चुका गुंतवणुकदारांना करत आहेत उद्ध्वस्त, पण समजून घेत नाहीत लोक
मुंबई : Stock Market Revenge Trading | मुंबईच्या नालासोपारामध्ये राहणारे हरीश मेहता आणि त्यांचा मुलगा जय मेहता यांना शेयर बाजारातील नुकसानीने अतिशय वाईट प्रकारे उद्ध्वस्त केले. परिणामी त्यांना आत्महत्या करून या नुकसानीची भरपाई करावी लागली. हरीश मेहता शेयर बाजारात काम करत होते, तर त्यांचा मुलगा जय मेहता डीटीपी ऑपरेटर होता.
शेयर बाजारातील नुकसानीची ३ मोठी कारणे
हर्षद मेहताच्या काळापासून आतापर्यंत शेयर बाजारात काम करणाऱ्या हजारो लोकांनी मोठे नुकसान झाल्याने आत्महत्या केली आहे. जीव देणाऱ्या या सर्व लोकांमध्ये एक गोष्ट समान होती… एकतर त्यांनी मोठी रक्कम बाजारात लावली अथवा मोठे कर्ज घेऊन पैसा मार्केटमध्ये लावला आणि मोठे नुकसान झाल्यावर मृत्यूला कवटाळले.
अलिकडच्या काही वर्षात फ्यूचर अँड ऑपशन ट्रेडिंग सुद्धा छोट्या गुंतवणुकदारांसाठी नुकसानीचे मोठे कारण ठरले. शेयर मार्केटमध्ये ३ मोठ्या चूका सामान्य माणसाला बुडवतात…
कर्ज घेऊन ट्रेडिंग
शेयर बाजारात अनेक लोक आपले पूर्ण पैसे पणाला लावतात आणि नुकसान झाल्यावर त्याची भरपाई करण्यासाठी कर्ज घेऊन पुन्हा बाजारात पैसा लावतात. शेयर मार्केटच्या भाषेत यास रिव्हेंज ट्रेडिंग (सूड) म्हणतात अथवा एका नुकसानीच्या भरपाईसाठी वारंवार पैसे लावून नुकसान करणे. शेयर मार्केटमध्ये बहुतांश गुंतवणुकदार याच रिव्हेंज ट्रेडिंगचे बळी ठरतात.
रिस्क मॅनेजमेंट नाही
शेयर बाजारमध्ये कायम जोखिम असते, यासाठी रिस्क मॅनेजमेंट खुप आवश्यक असते. परंतु, छोटे गुंतवणुकदार येथे सुद्धा नापास होतात. ते कधी जोखिम व्यवस्थापनाचा विचारच करत नाहीत.
समजा तुम्ही एखादा अमुक शेयर १५ रुपयांना खरेदी केला. तुम्हाला अपेक्षा आहे की त्याचा भाव २५ रुपयापर्यंत जाईल, परंतु एखाद्या परिस्थितीमध्ये शेयर कोसळतो आणि भाव १२ रुपयांपर्यंत गेला तर तुम्हाला तुमच्या नुकसानीची मर्यादा देखील ठरवावी लागेल.
परंतु, गुंतचणुकदार टार्गेटचे स्वप्न तर पाहतात पण नुकसानीची चिंता करत नाहीत.
हाच रिस्क मॅनेजमेंटचा नियम न पाळल्याने किरकोळ गुंतवणुकदार मोठे नुकसान करून घेतात.
कमी ज्ञान आणि मोठी स्वप्ने
जगातील कोणतेही काम असो, मग तो शेयर बाजार असो की अन्य काही, ज्ञान आणि अनुभवाची गरज असते.
शेयर मार्केटमध्ये पैसे लावणाऱ्या १०० पैकी ९० टक्के लोक इतरांच्या सल्ल्याने पैसे लावतात, जे अजिबात योग्य नाही.
कारण, हे मार्केट जोखिमीचे आहे यासाठी ते जाणून घेणे खुपच गरजेचे आहे.
अलिकडील काही वर्षात बहुतांश गुंतवणुकदार टीव्ही, यूट्यूब आणि
सोशल मीडिया प्लॅटफार्मवर मिळालेल्या टिप्सच्या भरोशावर शेयरमध्ये पैसा लावतात आणि नुकसान करून घेत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Reliance Retail | अनंतच्या विवाहापूर्वी नवीन बिझनेस सुरू करण्याची तयारी,
‘या’ व्यवसायात एंट्री करणार मुकेश अंबानी, चीनची कंपनी आणणार भारतात
Pune Crime News | पुणे: गाडीत बसण्यास नकार दिल्याने अश्लील शिवीगाळ करुन असभ्य वर्तन, एकाला अटक
Gautam Gambhir | गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक, जय शाहांची घोषणा
Pune Bopodi Hit & Run Case | पुणे पोलीस हवालदार मृत्यू प्रकरण : कारमधील तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात,
कारला ओव्हरटेक केल्याचा आला राग, भरधाव वेगात कार चालवली अन्…