Pune Crime News | पुणे : पॉलिसी सेटलमेंट करुन देण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक
पुणे : Pune Crime News | पॉलिसी सेटलमेंट करुन देण्याच्या बहाण्याने फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि.9) उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttam Nagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 15 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत ऑनलाइन घडला आहे. याबाबत शिवणे (Shivane Pune) येथील 37 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगारांनी फिर्यादी यांना फोन करुन एचडीएफसी बँकेतून मोहन पाठक बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्या पॉलिसीबद्दल माहिती देऊन पॉलिसी सेटलमेंट करण्यासाठी फोन केल्याचे सांगितले. तुमची मूळ रक्कम 17 लाख 72 हजार आणि बोनस रक्कम 2 लाख 46 हजार रुपये रक्कम असून तुम्हाला काढायची असल्यास आमच्या वरिष्ठांशी बोलावे लागेल असे सांगितले.
त्यानंतर दुसऱ्या क्रामांकावरुन फोन करुन लिंक पाठवत त्यावर क्लिक करण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी लिंकवर क्लिक केले. त्याद्वारे रिमोट अॅक्सेस मिळवून फिर्यादी यांच्या खात्यावर 6 लाख 92 हजार रुपयांचे परस्पर लोन घेऊन फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर युवकाने पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंदारे करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Reliance Retail | अनंतच्या विवाहापूर्वी नवीन बिझनेस सुरू करण्याची तयारी,
‘या’ व्यवसायात एंट्री करणार मुकेश अंबानी, चीनची कंपनी आणणार भारतात
Pune Crime News | पुणे: गाडीत बसण्यास नकार दिल्याने अश्लील शिवीगाळ करुन असभ्य वर्तन, एकाला अटक
Gautam Gambhir | गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक, जय शाहांची घोषणा
Pune Bopodi Hit & Run Case | पुणे पोलीस हवालदार मृत्यू प्रकरण : कारमधील तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात,
कारला ओव्हरटेक केल्याचा आला राग, भरधाव वेगात कार चालवली अन्…