IAS Dr Pooja Khedkar | पूजा खेडकरचे वडील कोट्यधीश; ‘वंचित’कडून लोकसभाही लढवली

IAS Dr Pooja Khedkar

पुणे : IAS Dr Pooja Khedkar | पूजा खेडकर यांचा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील श्रीमंती थाट आणि रुबाब चर्चेचा विषय ठरला होता. मुलीप्रमाणेच दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांची प्रशासकीय कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. २०२३ बॅचच्या परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर या सध्या चर्चेत आहेत. त्यांची नुकतीच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून (Pune Collector Office) वाशिममध्ये (Washim) बदली करण्यात आली आहे.

खासगी वाहनांवर लाल दिवा लावणे, सरकारी चिन्हांचा वापर करणे, आयएएस अधिकाऱ्यासारख्या सुविधा मागणे, वेगळी कॅबिन, स्वतंत्र सरकारी बंगला अशा काही मागण्या त्यांनी केल्या होत्या. आता पूजा खेडकर यांच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर यांच्या वडिलांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवली होती. पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार (RTI Vijay Kumbhar) यांनी खेडकर यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी सांगितलं की, पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांनी लोकसभा लढवली होती. त्यांची एकूण संपत्ती ४० कोटी इतकी आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न ४९ लाख आहे.

पूजा खेडकर यांनी अपंग व्यक्तीच्या कोट्यातून नियुक्ती मिळवली आहे. तसेच, त्यांनी ओबीसी नॉन क्रिमीलीयर सर्टिफिकेटचा फायदा घेतल्याचं सांगण्यात येत आहे. पूजा खेडकर यांचे वडील हे प्रदूषण नियंत्रण मंडळातील निवृत्त सरकारी अधिकारी होते.

नॉन क्रिमीलीयरची मर्यादा ८ लाखांची आहे. वडिलांचे वार्षिक उत्पन्न ४९ लाख असताना नॉन क्रिमीलीयर सर्टिफिकेटचा फायदा घेतल्याचा पूजा खेडकर यांच्यावर आरोप आहे. दिलीप खेडकर हे अधिकारी असताना त्यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यांचे निलंबनही झाले होते. त्यांचे मुळ गाव पाथर्डीमधील भालगाव आहे.

अभियांत्रिकीचे त्यांनी शिक्षण घेतले आहे. त्यांना दोन मुलं आहेत.
पूजा खेडकर या परिविक्षाधीन आयएएस अधिकारी आहेत,
तर पियुष हा लंडनमध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये दिलीप खेडकर यांना १३ हजार ७४९ मते मिळाली होती.

दिलीप खेडकर यांचे भाऊ माणिक खेडकर (Manik Khedkar) हे पाच वर्षे भाजपचे तालुकाध्यक्ष होते.
माहितीनुसार, त्यांनी पंकजा मुंडे यांना भाजपकडून लोकसभेचे तिकीट मिळावे यासाठी मोहटादेवीला साकडे घातले होते.
दीड किलो वजनाचा चांदीचा मुकूट अर्पण करणार असल्याचं ते म्हणाले होते.

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी मिळाल्यावर त्यांनी आपले साकडे पूर्ण केले होते.
सुजय विखेंसोबत (Sujay Vikhe-Patil) वाद झाल्यानेच त्यांनी वंचितकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.
परिविक्षाधीन आयएएसला मंजूर नसलेल्या सुविधा पूजा खेडकर मागत होत्या.
त्यानंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या रिपोर्टची दखल घेत त्यांची वाशिममध्ये बदली करण्यात आली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे : सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक परिसरात बेकायदा पिस्तूल मित्राला दाखवताना गोळीबार, एक जखमी

Mumbai Police Constable Wife Suicide | हुंड्यासाठी पोलीस पतीचे टोमणे, हळद उतरण्यापूर्वीच पत्नीने आयुष्य संपवलं!

Vidhan Parishad Election Maharashtra | विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटींगची भीती; कोणते उमेदवार डेंजर झोनमध्ये?

Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड

You may have missed