Amol Kolhe On Drones In Pune Rural | पुण्याच्या ग्रामीण भागात ड्रोन कशासाठी फिरवले जातात; गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे – अमोल कोल्हे
मंचर : Amol Kolhe On Drones In Pune Rural | पुणे जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यात रात्रीच्या वेळी ड्रोन फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर, मुळशी, आंबेगाव, शिरूर या तालुक्यांमध्ये रात्रीच्या वेळी काही ड्रोन घिरट्या घालत असल्याच समोर आले आहे. रात्री १०:३० ते मध्यरात्री २:०० वाजेपर्यंत काही भागात हे ड्रोन घिरट्या घालत आहेत. ड्रोन कोण उडवत होतं ? कशासाठी उडवत होतं ? त्या मागचा हेतू काय होता? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. वारंवार चौकशी करूनही प्रशासन गांभीर्याने घेत नाही. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन देऊन स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे.
मंचर येथील शरद पवार सभागृहात खासदार कोल्हे यांनी जनता दरबार घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वसामान्य नागरिक नेत्याशिवाय अथवा शिफारशी शिवाय समस्या घेऊन आले होते. प्रशासनापर्यंत पोहोचण्याचा दुवा जनता दरबार आहे. यापुढे प्रत्येक तालुक्यात दर महिन्याला जनता दरबार सुरू ठेवणार असल्याचे सांगून कोल्हे म्हणाले, महसूल, रस्ते, वीज मंडळ, पोलिस यासंदर्भात अनेक समस्या आल्या आहेत. शंभर अधिकारी उपस्थित होते. त्यांना या समस्यांचे निराकरण करण्याची सूचना केली आहे. या भागात रात्रीच्या वेळी आकाशात ड्रोन घिरट्या घालत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वारंवार चौकशीची मागणी करूनही समर्पक उत्तरे दिली जात नाहीत. याबाबत मी पत्र दिले होते. प्रशासनाने त्याबाबत अद्याप गांभीर्याने घेतले नाही. जिल्हा पोलिस अधीक्षकांशी बोललो असता त्यांच्याकडून कारवाई करू असे सांगण्यात येत आहे.
ग्रामीण भागात अनोळखी ड्रोनमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,
सदर ड्रोन कशासाठी वापरले जातात याचे निवेदन व स्पष्टीकरण गृहमंत्र्यांनी विधानसभेत द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. (Amol Kolhe On Drones In Pune Rural)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड