Sharad Pawar On Maharashtra Assembly Election | विधानसभेला मविआचे किती आमदार निवडून येणार?, शरद पवारांनी सांगितला आकडा; जाणून घ्या
मुंबई : Sharad Pawar On Maharashtra Assembly Election | शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली. जनतेचा आणि पक्षाचा घात केला अशा लोकांना या विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election Maharashtra 2024) धडा शिकवायचा आहे, असा इशाराच पवारांनी दिला आहे. शिवाय सध्याच्या स्थितीत महाविकास आघाडीला किती जागा मिळतील याचा अंदाजही त्यांनी सांगितला. लोकसभा निवडणुकीत मविआला (Mahavikas Aghadi) किती जागा मिळतील हा शरद पवारांचा अंदाज तंतोतंत बरोबर होता. त्यामुळे विधानसभेबाबतचा त्यांचा अंदाज महायुतीच्या (Mahayuti) उरात धडकी भरवणारा आहे.
“आता राज्यही चुकीच्या लोकांच्या हातात आहे, हे जनतेला समजले आहे. त्यामुळे जनता पुन्हा एकदा बदल करण्याच्या मनस्थितीत आहे. सध्याची जी परिस्थिती दिसते त्यानुसार महाविकास आघाडीला २८८ पैकी २२५ जागा मिळतील अशी स्थिती आहे”, असे शरद पवार म्हणाले. भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी शरद पवार गटात (Sharad Pawar NCP) प्रवेश केला त्यानंतर पवारांनी उपस्थितांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. (Sharad Pawar On Maharashtra Assembly Election)
आता पासूनच कामाला लागा. तुम्हाला ताकद देण्याची माझी जबाबदारी आहे.
जर या सरकारला घालवायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला ताकद देण्याची गरज असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले.
ज्यांनी पक्षाबरोबर घात केला.
लोकांचा विश्वास तोडला त्यांना धडा शिकवण्याचा निर्धार करत शरद पवार यांनी अजित पवार गटावरही (Ajit Pawar NCP) निशाणा साधला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड