Pune Crime News | पिंपरी: वाकड परिसरात वाहनांची तोडफोड, तरुणाला लुटणाऱ्या तिघांवर FIR

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | आरडा ओरडा करुन गाड्यांच्या काचा फोडत असताना तोडफोड करु नका असे सांगितल्याचा राग आल्याने तीन जणांनी तरुणाच्या गाडीची काच फोडून खिशातील 650 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच इतर वाहनांची तोडफोड करुन नुकसान केले. हा प्रकार बुधवारी (दि.10) मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास काळेवाडी गावठाणातील गणेश कॉलनीत (Ganesh Colony Kalewadi) घडली.
अंशु जॉर्ज किपलिंगकर (वय 23), आर्यन रमन पवार (वय 19, दोघेही रा. काळेवाडी) आणि करण रवी पटेकर (वय 25, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सतिश रामकेवल यादव (वय 30, रा. ज्योतिबानगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. यादव यांच्या फिर्य़ादीवरुन पोलिसांनी तिघांवर भान्यासं कलम 309(4), 3(5), 324 (4)/(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री पावणे एक वाजताच्या सुमारास आरोपी वाहनांच्या काचा फोडत होते.
त्यावेळी फिर्यादी यांनी तुम्ही गाडीच्या काचा का फोडत आहात, अशी विचारणा केली.
त्यावेळी आरोपी करण पटेकर याने फिर्यादी यांची कॉलर पकडून म्हणाला की, ‘तू मला ओळखत नाही
का, मला करण पटेकर म्हणतात. याला पकडा रे’, असे त्याच्या साथीदारांना सांगितले.
आरोपी अंशु व आर्यन यांनी पकडल्यावर आरोपी करण याने फिर्यादी यांच्या खिशात हात घालून 650 रुपयांची रोकड काढून घेतली. त्यानंतर फिर्यादी आणि इतर लोकांच्या वाहनांची तोडफोड केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड