BJP Sanwad Yatra In Maharashtra | विधानसभेसाठी भाजपची मोठी घोषणा; महाराष्ट्रभर संवाद यात्रा काढणार

मुंबई : BJP Sanwad Yatra In Maharashtra | लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकांना काही अवधी असताना भाजप महाराष्ट्रभर संवाद यात्रा काढणार आहे. याबाबतची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली. माध्यमांशी संवाद साधताना भाजप राज्यभर संवाद यात्रा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संवाद यात्रेतून भाजप जनतेत जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीत मविआ ने केलेला खोटा प्रचार उघडा पाडणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. बावनकुळे म्हणाले, पंधरा दिवसांपूर्वीच शरद पवार म्हणाले होते. महाविकास आघाडीला १५५ च्यावर जागा मिळणार नाही .आणि आता तेच म्हणताहेत की, राज्यात आघाडीला २२५ च्यावर जागा मिळणार आहे. लोकसभेला इंडिया आघाडीने जनतेची दिशाभूल करुन मतं घेतली.
आता जनता, आमच्या माता भगिनी त्यांना विचारताहेत, खटाखट साडे आठ हजार रुपये कुठं आहेत..? मागासवर्गीय समाजात सांगितलं की, भाजप संविधान बदलणार आहे, मोदीजींनी तर संविधान हातात घेऊन पंतप्रधानपदाची तिसरी टर्म सुरू केली. त्यामुळे खोटेपणा एकदाच चालतो, वारंवार नाही असा घणाघातही त्यांनी इंडिया आणि महाविकास आघाडीवर यावेळी केला. (BJP Sanwad Yatra In Maharashtra)
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने १६० पेक्षा कमी जागा लढवू नये,
अशी विनंती स्थानिक नेत्यांकडून भाजपच्या दिल्लीतील नेत्यांना करण्यात आल्याचे समजते.
भाजपने १६०-१७०, शिंदे गटाने सुमारे ७० व उर्वरित ५८ जागा अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस व
इतर पक्षांना दिल्या जाव्यात असेही प्रदेश भाजपमधील नेत्यांनी सुचवले असल्याची माहिती मिळत आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड