Trainee IAS Officer Puja Khedkar | पूजा खेडकरांच्या आईचा ‘मुळशी पॅटर्न’; पिस्तुल हातात घेत शेतकऱ्यांना दमदाटी, Video व्हायरल; पोलीस कारवाई करणार का?

पुणे : Trainee IAS Officer Puja Khedkar | महागड्या कारवर अंबर दिवा लावून फिरणाऱ्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासह आता त्यांचे कुटुंबाचे एकेक कारनामे समोर येऊ लागले आहेत. काल पूजाची गाडी जप्त करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना पूजा खेडकर हिची आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) हिने मी सगळ्यांना आत टाकेन अशी धमकी देत गेट उघडण्यास मज्जाव केला होता. आता याच मनोरमा खेडकर हिचा हातात पिस्टल घेऊन शेतकऱ्यांना दमदाटी करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये मनोरमा खेडकर या बाऊन्सर सोबत घेऊन मुळशी तालुक्यात शेतकऱ्यांना दमदाटी करताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्या हातात पिस्तुल दिसत असून त्यांनी ते एका शेतकऱ्यावर रोखल्याचेही दिसत आहे. जमिनीचा मूळ मालक आणि मनोरमा यांच्यात कोर्टात वाद सुरु आहे, असे या संभाषणातून स्पष्ट होत आहे. आता बिल्डर बळाच्या अंडर्व्ल्डशी संबंध असलेल्या आजोबाला आत टाकणारे पुणे पोलीस या व्हिडीओ वरुन मनोरमा खेडकर यांच्यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, काल पुण्यात मनोरमा यांच्याकडून पोलिसांना आणि माध्यमांना दमदाटी केल्याचा प्रकार घडला आहे.
पूजा खेडकर यांच्याकडे असलेल्या मोटारीने वाहतूक नियमभंग केल्याप्रकरणी 21 हजार रुपयांचा दंड आहे.
पुणे वाहतूक पोलीस नोटीस घेऊन पूजा खेडकरच्या घरी गेले होते.
गेट उघडण्यासाठी खेडकरच्या कुटुंबीयांना आवाज दिला गेला.
मात्र पूजा खेडकरच्या घरच्यांकडून कोणताही प्रतिसाद दिला नाही.
तसेच खेडकर यांच्या आईने पोलिसांनाच दमदाटी केली होती. (Trainee IAS Officer Puja Khedkar)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड