Pune Cyber Cell | पिंपरी : फसवणूकीच्या रक्कमेतून USDT डॉलर खरेदी, तिघांना सायबर सेलकडून अटक

पिंपरी : Pimpri Chinchwad Cyber Cell | शेअर ट्रेडींगच्या नावाखाली 18 लाख 12 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक (Cheating Fraud Case) करुन त्या रक्कमेतून युएसडीटी डॉलर खरेदी करणाऱ्या तिघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या (Pimpri Chinchwad Crime Branch) सायबर सेलच्या पथकाने मुंबईतून अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि 7 मोबाईल जप्त केले आहेत. पुढील कारवाईसाठी आरोपींना सांगवी पोलिसांच्या (Sangvi Police Station) ताब्यात दिले आहे. (Pune Cyber Cell)
अश्विन शेट्टी उर्फ अश्विन नारायण शेरगर (रा. भारती पार्क, मिरा भाईंदर मिरारोड पूर्व ता.जि. ठाणे), विरेंद्र राजेंद्रप्रसाद राय (वय-32 रा. नवलता कुंज, नवघर रोड, भाईंदर पूर्व, ठाणे), नासीर अब्दुल सय्यद (वय-36 रा. शांती पार्क, मिरारोड ईस्ट, ता. जि. ठाणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात आयपीसी 419, 420, 34 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर गुन्हेगारांनी फिर्यादी महिलेला एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करुन घेतले. ट्रेडींग प्लॅटफॉर्मवर पैसे गुंतवणुक केल्यास 25 ते 30 टक्के प्रॉफिट मिळून देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या बँक खात्यावर 18 लाख 12 रुपये भरण्यास भाग पाडले. त्यानंतर अपहार करुन आर्थिक फसवणूक केली. दाखल गुन्ह्याचा तपास सायबर सेल पथकाकडून करण्यात येत होता.
फिर्यादी महिलेने ज्या बँक खात्यात पैसे पाठवले होते त्या खात्याची माहिती घेतली असता अश्विन शेट्टी याने फसवणुकीच्या रक्कमेतून यूएसडीटी ही क्रिप्टोकरन्सी विकत घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पथकाने तांत्रिक तपास करुन तिघांना मुंबई येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, साथीदार सलमान व अभी (रा. दुबई) यांच्या संगनमताने गुन्हा केल्याची कबुली दिली. तिघांचा गुन्ह्यात समावेश असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून 4 लाख रुपये रोख, 7 मोबाईल जप्त केले. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत. (Pune Cyber Cell)
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी,
पोलीस उपायुक्त गुन्हे संदिप डोईफोडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-1(अति. कार्यभार उपायुक्त गुन्हे) स्वप्ना गोरे,
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी,
पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, रविंद्र पन्हाळे, पोलीस अंमलदार अतुल लोखंडे, नितेश बिचेवार, सौरभ घाटे,
श्रीकांत कबुले, दिपक भोसले, सचिन घाडगे, अभिजीत उकिरडे, अशोक जवरे यांच्या पथकाने केली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड