Constitution Assassination Day | 25 जून ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून पाळला जाणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
दिल्ली: Constitution Assassination Day | संविधानाच्या मुद्द्यावरून काँग्रेसला (Congress) धक्का देण्यासाठी केंद्र सरकारने मोठी खेळी केली असून आणीबाणीची घोषणा झालेला २५ जून हा संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत संविधानाचा मुद्दा महत्वाचा ठरला. तसेच एनडीएने केंद्रात सरकार (NDA Modi Govt) स्थापन केल्यानंतर पहिल्या संसदीय अधिवेशनात विरोधकांच्या हातात संविधान पाहायला मिळाले.
संविधानाच्या मुद्द्यावरून भाजपला (BJP) लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला. यानंतर आता विरोधकांना प्रत्युत्तर म्हणून सरकारने आणीबाणीचा निषेध करणारा प्रस्ताव लोकसभेत आणला होता. आता संविधानाच्या मुद्द्यावरून काँग्रेसला धक्का देण्यासाठी केंद्रसरकारने मोठी खेळी केली असून आणीबाणीची घोषणा झालेला २५ जून हा ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून पाळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
आता दरवर्षी २५ जून रोजी संविधान हत्या दिवस पाळला जाईल, असे अमित शाह यांनी याबाबतची घोषणा करताना सांगितले. याबाबत घोषणा करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, २५ जून रोजी १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्या हुकूमशाही प्रवृत्तीचे दर्शन घडवताना भारतीय लोकशाहीचा गळा आवळला होता. (Constitution Assassination Day)
लाखो लोकांना विनाकारण तुरुंगात टाकण्यात आले होते. तसेच प्रसारमाध्यमांचाही आवाज दाबण्यात आला होता.
आता भारत सरकारवने २५ जून हा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
या दिवशी १९७५ च्या आणीबाणीच्या काळात ज्या लोकांनी यातना भोगल्या, त्यांचे स्मरण केले जाईल,
असे अमित शाह यांनी म्हंटले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड