PMC Action On Unauthorized Hotel In Pashan | पाषाण येथील 11 शोरुम, हॉटेल्सवर पुणे महापालिकेकडून कारवाई

PMC Action On Unauthorized Hotel In Pashan

पुणे : PMC Action On Unauthorized Hotel In Pashan | कल्याणीनगर येथे घडलेल्या पोर्शे अपघात प्रकरणानंतर महापालिकेने शहरात रूफ टॉप हॉटेल तसेच अनधिकृत पबच्या बांधकामांवर कारवाई सुरु केली होती. या कारवाईत सुमारे १४४ हॉटेलवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई थंडावली होती. मात्र, त्यानंतर फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेलमध्ये ड्रग्स सापडले होते. त्यानंतर महापालिकेकडून फर्ग्युसन रस्त्यापासून कारवाईस सुरुवात करण्यात आली होती.

त्यानंतर बाणेर, खराडी, औंध, सिंहगड रस्ता, शिवाजीनगर या भागात अनधिकृत बांधकाम निर्मूलन पथकाने जोरदार कारवाई केली होती. पालिकेच्या बांधकाम विभागाकडून आज पाषाण येथेही कारवाई करण्यात आली. हे बांधकाम एचईएमआरएल या संरक्षण विभागाच्या प्रतिबंधित क्षेत्रात येत आहे. या बाबत एचईएमआरएल यांच्याकडुन तक्रारी करण्यात आल्या होत्या. तसेच हे क्षेत्र पीएसपी झोन मध्ये येत आहे. (PMC Action On Unauthorized Hotel In Pashan)

पाषाण येथे अनाधिकृतपणे उभारलेले ११ शोरूम, हॉटेल्स यांच्यावर पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने आज पुन्हा एकदा कारवाई केली. त्यामध्ये सुमारे ९० हजार चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले. या मधील ७ मिळकतधारकांनी न्यायालयातून स्थगिती आदेश आणले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. यावेळी कटर मशीन, दोन जेसीबी, गॅस कटर, ब्रेकर, 15 बिगारी व पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

यावेळी चतुःशृंगी पोलीस स्टेशन चे कर्मचारी सुद्धा उपस्थित होते.
खबरदारीचा उपाय म्हणून अग्नीशमन विभागाची गाडी तयार ठेवण्यात आली होती
अशी माहिती पालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी सुनिल कदम यांनी दिली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे : सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक परिसरात बेकायदा पिस्तूल मित्राला दाखवताना गोळीबार, एक जखमी

Mumbai Police Constable Wife Suicide | हुंड्यासाठी पोलीस पतीचे टोमणे, हळद उतरण्यापूर्वीच पत्नीने आयुष्य संपवलं!

Vidhan Parishad Election Maharashtra | विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटींगची भीती; कोणते उमेदवार डेंजर झोनमध्ये?

Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड

You may have missed