Pune Deccan Parking | चतु:श्रंगी, डेक्कन व विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत पार्किंग व्यवस्थेत तात्पुरते बदल
पुणे : Pune Deccan Parking | वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता पुणे शहरातील चतु:श्रंगी, डेक्कन व विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत रस्त्यावरील पार्किंग व्यवस्थेतील बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत.
चतु:श्रंगी वाहतूक विभागांतर्गत औंध येथील सिझन्स रोडवरील पंजाब नॅशनल बँक ते शाश्वत हॉस्पिटल रामबाण सहकारी गृहरचना सर्व्हे नंबर २५३/२ औंध सोसायटीच्या कमानी दरम्यान तसेच औंध येथील मेडीपॉईंट हॉस्पिटल चौक साई हॅरीटेज ते ज्ञानेश्वर मुरकुटे कमानीजवळील शिव शक्ती फ्लोअर मिल पर्यंत एकूण ६०० मीटर रस्त्यावर दोन्ही बाजुस पी १ पी २ पार्किंग झोन करण्यात येत आहे.
डेक्कन वाहतूक विभागांतर्गत भांडारकर रस्त्यालगत गल्ली नंबर ७ चे पूर्वेस असणाऱ्या रिक्षा स्टॅन्ड करिता जागा सोडून ते द-सोल बंगलाचे गेट पर्यत २० फुट दुचाकीसाठी पार्किंग करण्यात येत आहे. तसेच द-सोल बंगलाचे गेट पासून ते दानी बंगल्याचे मुख्य गेट (४० फुट ) दुचाकी पार्किंग व सिद्धसिला हाऊस कॉर्नरला लाईट खांब नंबर ६६/०७ ते सिद्धसिला गेट २५ फुट समोर दानी बंगल्यापर्यंत दुचाकी करिता पी १ व पी २ पार्किंग करण्यात येत आहे.
विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत अनंत कान्हेरे पथावरील मयूर स्वीट मार्ट ते सेनादत्त पोलीस चौकी दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूस (१.३ कि.मी.) नो हॉल्टींग व नो पार्किंग झोन करण्यात येत आहे.
पार्किंग व्यवस्था बदलाबाबत या तात्पुरत्या आदेशाच्या अनुषंगाने नागरिकांच्या काही सूचना व
हरकती असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, जेल रोड,
पुणे यांच्या कार्यालयात २५ जुलैपर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात.
नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील,
असे पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांनी कळविले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड