IAS Puja Manorama Dilip Khedkar | IAS पूजा खेडकर आई मनोरमा खेडकर, वडील दिलीप खेडकर यांच्यासह 5 जणांविरुद्ध गुन्हा (Video)
पुणे : IAS Puja Manorama Dilip Khedkar | आयएएस प्रोबेशनर अधिकारी डॉ. पूजा खेडकर यांच्या कुटुंबाचे एक-एक कारनामे समोर येऊ लागले आहेत. पूजाच्या आईने जमीन खरेदीच्या वादातून शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पूजाची आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) वडील दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांच्यासह पाच जणांविरुद्ध पुणे ग्रामीण पोलिसांत (Pune Rural Police) शुक्रवारी गुन्हा दाखल केला आह. हा प्रकार 04 जून 2023 रोजी दुपारी एकच्या सुमारास व 05 जून 2023 रोजी सायंकाळी चारच्या सुमारास मुळशी तालुक्यातील (Mulshi Taluka) मौजे धडवली येथील सर्व्हे नं.12/1 मध्ये घडला आहे. (IAS Puja Manorama Dilip Khedkar)
मनोरमा खेडकर, दिलीप खेडकर (दोघे रा. नँशनल हाउजिंग सोसाइटी बाणेर पुणे), अंबादास खेडकर (रा आंबी ता हवेली जि पुणे), तिचे सोबत आलेले काळे कपडयांमधील अनोळखी दोन पुरूष (नाव पत्ता माहीत नाही), अनोळखी दोन महिला व इतर गुंड लोक (नाव पत्ता माहीत नाही) यांच्यावर भारतीय दंडसहीता चे कलम 323, 504, 506, 143, 144, 147, 148, 149 आर्म अँक्ट 3(25) नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पंढरीनाथ कोंडीबा पासलकर (वय 65 व्यवसाय. शेती मुळ रा. मु पो केडगाव (आंबेगाव पुनवर्सन) ता.दौड जि.पुणे) यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पंढरीनाथ पासलकर यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.04/06/2023 रोजी दुपारी एकच्या सुमारास व दि.05/06/2023 रोजी सायंकाळी चारच्या सुमारास मुळशी तालुक्यातील मौजे धडवली येथील सर्व्हे नं.12/1 मध्ये माझे सोबत तसेच जमीनीचे देखभाल करणारे मारूती मरगळे यांच्या कुटुंबीयांसोबत होतो. त्यावेळी मनोरमा खेडकर, दिलीप खेडकर व त्यांच्या सोबत आलेले काळे कपडयांमधील अनोळखी दोन पुरूष, दोन महिला व इतर गुंड लोक यांनी आम्हाला मारहाण, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच दहशत निर्माण करण्यासाठी आमच्यावर पिस्तुल रोखल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहोत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड