Lonikand Pune Crime News | पुणे: इंन्स्टाग्रामवर अश्लील मेसेज, क्लासला जाताना पाठलाग अन् शिवीगाळ; तीन अल्पवयीन मुलांसह चार जणांवर पोक्सोचा गुन्हा

Instagram-Rape

पुणे : Lonikand Pune Crime News | इंन्स्टाग्राम ग्रुपवर (Instagram Group) अश्लील चाटिंगचे (Vulgar Licking) मेसेज करुन 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला (Molestation Case). तसेच क्लासला जाताना तिचा पाठलाग करुन शिवीगाळ केली. हा प्रकार बुधवारी (दि.10) सकाळी दहा ते दुपारी दोन या कालावधीत खांदवे नगर (Khandve Nagar) आणि उबाळेनगर (Ubale Nagar) येथे घडला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police Station) तीन अल्पवयीन मुलांसह चार जणांवर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने शुक्रवारी (दि.12) लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार सार्थक सातव याच्यासह तीन अल्पवयीन मुलांवर भारतीय न्याय संहिता कलम 74, 78(ब), सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. महिला सहायक पोलीस निरीक्षक विजया वंजारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी इंस्टाग्राम ग्रुपवरती पिडीत मुलीबद्दल अश्लील चाटिंग मेसेज पाठवून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

पिडीत मुलगी बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास उबाळेनगर येथे कॉलेजमध्ये जात असताना
तिच्याकडे रागाने पाहून अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर पिडीता दुपारी खराडी येथील क्लासला जात होती. त्यावेळी आरोपींची चारचाकी गाडीतून तिचा पाठलाग केला. त्यावेळी सार्थक गाडी चालवत होता तर इतर तीन अल्पवयीन मुले गाडीत बसली होती. आरोपींनी गाडी आडवी मारुन पिडीतेला रस्त्यात अडवले. अल्पवयीन मुलाने तिला अश्लील शिवीगाळ करुन तिला मारण्यासाठी तिच्या अंगावर धावून आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास एपीआय विजया वंजारी (API Vijaya Vanjari) करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे : सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक परिसरात बेकायदा पिस्तूल मित्राला दाखवताना गोळीबार, एक जखमी

Mumbai Police Constable Wife Suicide | हुंड्यासाठी पोलीस पतीचे टोमणे, हळद उतरण्यापूर्वीच पत्नीने आयुष्य संपवलं!

Vidhan Parishad Election Maharashtra | विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटींगची भीती; कोणते उमेदवार डेंजर झोनमध्ये?

Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड

You may have missed