IAS Puja Khedkar | पुणे : पूजा खेडकरवर कारवाई करा, दिव्यांगांची राज्य दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे मागणी
पुणे : IAS Puja Khedkar | वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची त्वरीत चौकशी करावी. त्यांनी खोटे दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र सादर करुन आयएएस पद मिळवल्याचे निष्पन्न झाले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांनाही सोडू नये, अशी मागणी दिव्यांग नागरिकांनी राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त डॉ. प्रवीण पुरी (IAS Pravin Puri) यांच्याकडे केली आहे. (IAS Puja Khedkar)
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून 2018 मध्ये नेत्र दिव्यांगाचे प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. हे प्रमाणपत्र सादर करुन पूजा खेडकर यांनी परीक्षेत वरची श्रेणी मिळवली असल्याची चर्चा आहे. पूजा खेडकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कार्यालय बळकावले, खासगी गाडीवर सरकारी अंबर दिवा लावला असे अनेक आरोप त्यांच्यावर होत आहेत. या प्रकरणाची दखल थेट पंतप्रधान कार्यालयाने घेतली असून जिल्हाधिकारी यांच्याकडून याबाबतचा अहवाल मागवला आहे.
राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त डॉ. प्रवीण पुरी यांची याचसंदर्भात दिव्यांगांच्या संघटनांचे प्रतिनिधी रफिक खान, धर्मेंद्र सातव, सुरेखा ढवळे, सुनंदा बाम्हणे, विष्णूपंत गुंडाळ, सुप्रिया लोखंडे यांनी भेट घेतली. रफिक खान म्हणाले, दिव्यांग चा संघर्ष जन्मापासूनच सुरु होतो. तो शाळेत, महाविद्यालयात आपले शिक्षण कसे पूर्ण करतो त्यालाच माहिती, त्यानंतर नोकरीसाठी त्याला संघर्षच करावा लागतो. खोट्या प्रमाणपत्रामुळे खरा दिव्यांग त्याच्या न्याय हक्कापासून वंचित राहतो. त्यामुळे हा गंभीर स्वरुपाचा सामाजिक गुन्हा आहे. आकाश कुंभार यांनी यावेळी असे किती लोक आहेत त्यांची चौकशी करावी अशी मागणी केली. यावेळी डॉ. पुरी यांनी चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड