Vishrantwadi Police Station News | जागतिक अंमली पदार्थ दिनानिमित्त विश्रांतवाडी पोलिसांची जनजागृती; अडीच हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Vishrantwadi Police Station

पुणे : Vishrantwadi Police Station News | जागतिक अंमली पदार्थ दिनानिमित्त विश्रांतवाडी पोलिसांनी हद्दीतील शाळा महाविद्यालयांमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत दोन ते अडीच हजार विद्यर्थी, प्रिन्सिपल, मुख्याध्यापक तसेच शिक्षकांनी सहभाग घेतला होता. विश्रांतवाडी पोलिसांकडून 26 जून ते 12 जुलै या कालावधीत जनजागृती अभियान राबविण्यात आले.

अंमली पदार्थ विरोधी सप्ताह अंतर्गत जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत नारायण ग्यानबा मोझे विद्यालय, धानोरे, लोकमान्य टिळख हायस्कुल, विश्रांतवाडी, जनता हायस्कुल कस्तुरबा हौसिंग सोसायटी, विश्रांतवडी, विश्वभारती विद्यालय, टिंगरेनगर, पुणे इंटरनॅशनल स्कुल, टिंगरेनगर, धनेश्वर विद्यालय, धानोरा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंग्रजी माध्याम हायस्कुल, भैरवनगर, डॉ. मारथेफिल्यस स्कुल, धानोरी, रश्मी इंग्लिश स्कुल आळंदी रोड, ट्रिनिटी स्कुल, माळवाडी, या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता 8 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळे दरम्यान विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस निरीक्षक गुन्हे शंकर साळुंखे, सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, शरद माळी, पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड, पद्मराज गंपले, सुधा चौधरी, निशीगंधा शिंगे, गोपनिय पथकाचे पोलीस अंमलदार गणेश पारडे, दामिनी मार्शल तसेच मुक्तांगण व्यसनमुक्ती संस्थेच्या संचालीका मुक्ता पुणतांबेकर, जनजागृती विभाग प्रमुख निहार हसबनीस, समुपदेशन दत्ता श्रीखंडे, मंगेश कराळेकर, वैभव देवकर, माधव कोल्हटकर, मिरज शिवडे, मंदार शेट्टी, प्राजक्ता पेंडसे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनापासुन होणारे दुष्परिणाम, व्यसनामुळे आपले परिवार व शरीरावर होणारे परिणाम, वाढती बालगुन्हेगारी, बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत येणारे बाल हक्क व संरक्षण, वाहतुक नियम, सायबर क्राईम, सोशल मीडिया, नवीन कायदा, पोलीस काका आणि दिदी, डायल 112, महिला हेल्प लाईन 1091, 1291 तसेच सायबर तक्रार हेल्प लाईन 1930 याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे : सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक परिसरात बेकायदा पिस्तूल मित्राला दाखवताना गोळीबार, एक जखमी

Mumbai Police Constable Wife Suicide | हुंड्यासाठी पोलीस पतीचे टोमणे, हळद उतरण्यापूर्वीच पत्नीने आयुष्य संपवलं!

Vidhan Parishad Election Maharashtra | विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटींगची भीती; कोणते उमेदवार डेंजर झोनमध्ये?

Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड

You may have missed